आंदोलनदेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

०५ ऑगस्ट २०२६ दिल्लीत ऐतिहासिक नोंद “दिबांची वारी दिल्लीच्या दारी “

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०६ ऑगस्ट २०२६ ऐतिहासिक दिबा नामकरण मोर्चा सर्व समाज एकाच मंचवर, मनात ठरवल तर मुंबईसागरी किनारीचे भुमिपुत्र व १२९ गावठाणातील व इतरही राज्यातील दिबा पाटील प्रेमी एकत्र आले, आणि दिल्लीचे तख्त हलवले याची प्रचिती आज संपूर्ण जगाने पाहीली! तरी नावाचे राजकारण न करता लवकरात लवकर मागणी मान्य करा चाल ढकल खूप झाली, राज्य सरकार व कोर्टाने ही आपले मत मांडले आता फक्त केंद्र सरकारच राहीले आहे. आलेला प्रस्ताव विलंब न करता मान्य करून जी. आर. काढून विमानतळाची प्रलंबित मागणी मान्य करावी काल दिल्ली जंतरमंतरची झलक पुरेशी आहे. या आधी नवीमुंबईत अनेकदा आंदोलन, मोर्चे, रॅली काढून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते.  आत्ता पर्यंत तीन मुख्यमंत्री यांनी देखील मान्य करुन फाईल विमान वाहतूक मंत्री व केंद्र सरकार यांच्या कडे वर्ग केली आहे. देशातील अनेक विमानतळाचे प्रलंबित नामकरण झाले देखिल मग नवीमुंबई विमानतळाचे नामकरण अनेकदा मुख्यमंत्री, सांसद यांनी प्रस्ताव मंजूरीची मागणी केली असताना केंद्र सरकार वेळ काढूपणा का करीत आहे. असा प्रश्न सर्व भुमिपुत्र करीत आहे. काल जंतर मंतर वर अनेक दिग्गज नेते पक्षपात न करता दिबा पाटील साहेब  नावासाठी समर्थन व जाहीर पाठिंबा देण्यात आला येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरू असे अश्वासन दिले. खासदार : सुप्रिया सुळे ताई, संजय सिंह, सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ), जगदीश गायकवाड, संजय राऊत, अनेक आमदार, नगरसेवक व दिल्ली, गुजरात, एमपी मधील आगरी बांधव, २९ गाव, २७ गाव संघर्ष समिती, मुंबई, नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, पालघर, भिवंडी, उरण, पनवेल  यांनी पारंपरिक आगरी कोळी वेशात आणि “दिबांची वारी दिल्लीच्या दारी “असे भजन, नामघोष करत पालखीचे स्वरूप दिल्लीमध्ये दाखल झाले आणि सर्वांचे लक्ष वेधण्यात आले. चांगला प्रतिसाद दिला.  एकंदरीत ०५ ऑगस्ट २०२६ या दिवसांची ऐतिहासिक नोंद केली जाईल अशी अपेक्षा सर्व भूमिपुत्रांची आहे. अनेक वेळा प्रस्ताव देऊन देखील सरकार दुर्लक्ष करीत असेल तर येत्या काही काळात विमानतळ बंद करण्याचा ठाम निर्णय आता सर्व भूमिपुत्रांनी घेतला आहे.
“सहन करणार नाही छळ..
दिबा साहेबांच्या नावाचेच होणार विमानतळ “!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!