स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेले ठाणे- पालघर जिल्ह्यातिल पाणजू गाव!

प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. ०९ ऑगस्ट २०२६ ठाणे- पालघर जिल्हा आजपर्यंत सर्वांत जास्त एकाच गावातील व एकाच समाजाचे स्वातंत्र्य सैनिकांचे गाव पण तरीदेखील जगासमोर व समाजाला, भूमिपुत्रांना माहित नसलेले महान गाव पाणजू या छोट्याशा गावाने २१ सैनिक स्वातंत्र्यासाठी दिलेले. गावातून वेस्टर्न रेल्वेची रेल्वे वाहतूक आहे, १९५६ साला पर्यंत
पांजू रेल्वे स्टेशन होते, आता ते नसल्यामुळे केवळ येथे येण्यासाठी होडीचाच पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे मुंबईत असूनही एक बेटच राहीलेले, छोटस खेड गाव. सहाजिकच तेथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यापैकी शिक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा, गेल्या पंचवीस वर्षांपासून येथील शिक्षक माध्यमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत विद्यार्थी संख्येअभावी शाळेला शासन मान्यता जरी असली तरी अनुदान मात्र मिळणे कठीण झाले आहॆ, साहजिकच शाळा चालविणे जिकीरीचे झाले आहे.
गावात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी प्राथमिक शिक्षणाची सोय आहे तेथेही रोडावणारी विध्यार्थी संख्या, वर्ग सात आणि शिक्षक फक्त दोन असले तरी कोणतीही कसर न करता केवळ ३२ विध्यार्थी असले तरी कोणतीही कमी राहू नये म्हणून विध्यार्थी घडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना दिसून येतात, मराठी शाळा असूनही सर्व मुलांनी इंग्रजीचे वाचन करणे असे उपक्रम शाळा राबविते.
माध्यमिक शाळेचा ही शालेय निकाल नेहमी १००% असतो. गेल्या २५ वर्षात माध्यमिक शाळेतून ५०० विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, १५० विद्यार्थी पदवीधर झालेले आहेत. सुशिक्षित गाव म्हणून गावची ओळख बनत आहे.
गावची लोकसंख्या कमी, त्यातच लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित राहिल्यामुळे गावात मुलांची संख्या कमी आहे. शिक्षणाकरता गावाबाहेर जाणारी सर्व मुले त्यात इंग्रजी माध्यमाची सर्व पकडली तरीही प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या दहाच्या वर जाणार नाही.
शासनाच्या अनुदानाकरता प्रत्येक वर्गात कमीत कमी ३० विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा झाला की अशा शाळेला कधीही अनुदान मिळणे शक्य नाही मग शाळा चालवायची कशी.
सर्व शिक्षा अभियान सांगते बारावीपर्यंत सर्वांना सक्तीचे मोफत शिक्षण द्यावे.
शासनासमोर आमचे म्हणणे असे की अशा दुर्गम भागात शिक्षण पोचवायचे कसे, अशा भागात अपवादात्मक बाब म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गावाने स्वातंत्र्यलढ्यात २१ सैनिक दिले असताना, त्यांची मुलं शिक्षणाकरता धडपडत आहेत. शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत वसई प्रगती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी वसई यांनी धर्मदाय निधी आणि संस्थेच्या अंशदान योजनेतून आर्थिक मदतीने शिक्षक आणि संस्थाचालक यांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली आहे. समृद्धी करीता- खऱ्या अर्थाने प्रगतीची गरज असणाऱ्या संस्थेला मदत देऊन उभारी दिली आहे, गावात त्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. आमचे आधार स्तंभ श्री. जयंत पाटील – माजी उप नगराध्यक्ष मीरा भायंदर महानगर पालिका नेहमीच मदत करीत असतात.
पाणजू गावाची माहिती श्री. देवेंद्र ना.भोईर यांनी दिली.



