नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष – प्रशासनाचा जाहीर निषेध!

प्रतीनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०८ ऑगस्ट २०२६ कल्याण, डोंबिवली येथिल मनामानी कारभाराला आळा कधी बसणार? प्रवाशांच्या व्यथा सरकार, प्रसासन कधी मनावर घेणार?
होणारी लुट कधी थांबणार?
डोंबिवली केळकर रोड परिसरात मागील काही दिवसांपासून रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. नागरिक त्रस्त मानपाडा रोड, स्टार कॉलनी, सागाव या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रिक्षाचालक सर्रास भाडे नाकारतात रिकाम्या रिक्षा प्रवाशांसमोरून पुढे जातात कामावरून आलेल्या महिला व नागरिकांना २ ते ३ तास स्टेशनवर थांबावे लागते.
काल (बुधवार) रात्री नागरिकांना तब्बल २ ते ३ तास रिक्षासाठी रांगेत उभे राहावे लागले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की नागरिकांनी एस. राणे मॅडम यांना संपर्क साधला.
त्याही तात्काळ घटनास्थळी जाऊन कठोर भूमिका घेतली व एकही रिक्षा पुढे जाऊ दिली नाही. नागरिकांनीही एकत्र येत आंदोलन करत रस्त्यावर बसून निषेध व्यक्त केला.
यानंतर RTO अधिकारी व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. परंतु, दुर्दैवाने त्यांनी नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी रिक्षाचालकांची बाजू घेतली आणि काही रिक्षा मागील बाजूने सोडून दिल्या.
यावेळी राणे मॅडम यांनी RTO अधिकारी व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करते असे बोलल्या.
रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढवण्यासाठी अधिकारीच जबाबदार आहेत, असा माझा ठाम आरोप आहे असे ही त्या यावेळी बोलत्या.
रिक्षा युनियन नागरिकांच्या बाजूने उभे राहत नाहीत, फक्त पैसे कमावण्यावर लक्ष आहे.
आजपर्यंत कोणताही RTO किंवा ट्रॅफिक अधिकारी केळकर रोड येथे प्रत्यक्ष उभा राहत नाही.
इशारा:
आजपासून जर केळकर रोड येथे रिक्षा व्यवस्थित लाईनमध्ये उभ्या राहिल्या नाहीत आणि नागरिकांना पुन्हा त्रास झाला, तर कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
मागणी:
रिक्षा भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करावी
संबंधित RTO व ट्रॅफिक अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे
केळकर रोड येथे कायमस्वरूपी नियंत्रणासाठी अधिकारी नेमावेत
नागरिकांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील!
रिक्षा जनतेच्या सेवेसाठी का फक्त रस्त्यावर गर्दी व मर्जीचे भाडे स्विकारण्यासाठी आहेत? अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे.
यांना कायदा लागू होत नाही का?
मग कायदेशीर कारवाई का होत नाही? पोलीस प्रशासन विभाग यांचे लागेबंधे आहेत का असे अढळल्यास दोघांना देखील शासन झालेच पाहिजे!



