महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई पंजाब प्रमाणे मिळावी म्हणून वेलफेयर पार्टी ऑफ़ इंडियाचे उपमुख्यमंत्री अजितदादांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑक्टोबर २०२५ सालार भाई शेख वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया पुणें जिल्हा सचिव यांनी काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यात ते लिहितात की दादा आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे पूर आला आहे व काही ठिकाणी तर जमिनी वाहून गेल्या आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार मदत जाहीर करण्यात आली आहे परंतु ती मदत अपुरी आहे. पंजाब मधील शेतकऱ्यांना हेक्टरी- ५०,००० तर एकरी- २०,
००० इतकी मददत मिळत आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने हेक्टरी- ८५०० हजार तर एकरी- ३४०० हजार जाहीर करण्यात आली आहे. असा दुजा भाव कशासाठी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तरी शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना जिवंत ठेवायचं असल्यास त्यांना भरपुर लाभ भेटला पाहिजे व सविस्तर सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई करण्यात यावी पंजाब मधील शेतकऱ्यांना जसा मोबदला मिळत आहे तसाच मोबदला आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना मिळावा व येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्या या
उपाय योजनाचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावे अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.
यावेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पुणें जिल्हा सचिव सालार भाई शेख, पिंपरी चिंचवड शहर सचिव रहीम शेख, उपाध्यक्ष ईमाम नदाफ, मौलाना एहसान, खाजा नदाफ, समीर शेख, अरमान तांबोळी, इत्यादी उपस्थित होते.



