राहुल मदनेच्या ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर मूळे सत्तादाराना फुटला घाम..

प्रभाग क्रमांक १७ आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने स्टॅम्प पेपरवर दिला लेखी वचननामा..
सामान्य कुटुंबातला राहुल निवृत्ती मदने यांच्या स्टॅम्प पेपर वरील वचननाम्यामूळे सत्ताधारी पक्षातील मंत्री मंडळातील सदस्यांना प्रभाग १७ मधे येऊन जनतेला आपल्याच पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी यावे लागते..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ जानेवारी २०२६ सामान्य कुटुंबातले आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल निवृत्ती मदने यांच्या स्टॅम्प पेपर वरील वचननाम्यामूळे सत्ताधारी पक्षातील मंत्री मंडळातील सदस्यांना प्रभाग १७ मधे येऊन जनतेला आपल्याच पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी यावे लागते. ही लढाई प्रभाग क्रमांक १७ मध्ये सूरू आहे. जनतेला माहीत आहे. असे राहूल मदने समर्थक सांगत होते.
गेली अनेक वर्षापासून आमच्या सुख दुःखात कोण पुढे येऊन आधार देतो. हे आम्हाला माहित आहे. तेव्हां प्रभाग १७ मधून कोणाला समर्थन आहे हे आम्ही रोजच पाहतो असे ही एका समर्थकाने यावेळी सांगीतले.
ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ५ वर्षातून १० दिवसाची जत्रा असते या जत्रेत अनेक उमेदवार घरी येतील पाया पडतील पैशांचे आमिष दाखवतील पण १६ जानेवारी पासून तितक्याच वेगाने गायब ही होतील. पण हो राहूल मदने हे काल ही आमच्या सोबत होते, आज ही आहेत, आणि उदया ही सोबत असतील कारण ते आमच्यातील एक आहेत सामान्य कुटुंबातील आहेत सामान्य कुटुंबातील अडीअडचणी ते जाणतात.
सामान्य जनतेचा विश्वास..
राहुल निवृती मदने सारखा कार्यकर्ता या प्रभागाला लाभला हेच आमचे भाग्य आहे. रात्री अपरात्री कसल्या ही संकट काळी फोन करताच मदतीला उभा राहणार व आम आदमी पक्षाच्या निस्वार्थ वृत्तीने समाजसेवेचे वृत जोपासणार्या पक्षा सोबत असणार्या राहूल मदनेंना जन मानसातून चांगला प्रतिसाद भेटताना दिसतो आहे.
यावेळी राहुल मदने हे रिंगणात असल्यामुळे जनताच दाखवून देणार त्यांचा खरा पाठीराखा कोण असणार आहे.
यावेळी राहुल मदने बोलले की माझा संघर्ष जनतेने पाहिला आहे कोणते ही पद नसताना, कोणत्याही भाऊ दादांचा हात पाठीवर नसताना रात्रंदिवस समाजाची सेवा केली. आता वेळ समाजाच्या सर्व घटकांची आहे त्यांनी ठरवावे कामा आधी स्टॅम्प पेपरवर वचननामा लिहून देणारा सेवक हवा की या प्रभागाला खोटी अश्वासने देणारा नेता हवा.
येणाऱ्या १६ जानेवारीला एक क्रांती होणार आहे.
धन शक्ती विरुद्ध जन शक्ती जिंकणार आहे.
हाच सामान्य जनतेचा विजय असेल…



