महाराष्ट्रशोध इतिहासाचा..सामाजिक

शिवरायांचे घेतले एकेरी नाव संजय गायकवाड आता धीरेंद्र कृष्ण शात्रीचे करणार काय ?वादग्रस्त वक्तव्याने कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा?

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २६ एप्रिल २०२६ नागपूरमध्ये भारतदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले अन् रामदास स्वामींना… बागेश्वर बाबाने तोडले अकलेचे तारे, त्या वक्तव्याने मोठा वाद वाढला असल्याचे दिसून येते.

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, महाराज रामदास स्वामी जवळ गेले, आणि आता युद्ध लढणार नाही असे सांगितले, व त्यांना राजपाट सांभाळण्यास सांगितले. रामदास स्वामींनी सांगितले की ठीक आहे. शिष्य हा गुरुचे मानतो, त्यामुळे आजपासून राज्य तुम्हालाच चालवावे लागेल.” असे वक्तव्य करून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाची भर पडली आहे. यावर आमदार संजय गायकवाड धीरेंद्र कृष्ण शास्त्री विरोधात काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरेल,
या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते. तरी देखील महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य होते. यात पुढे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की आज भारतीय सनातन धर्माला आणखी जास्त गौरव होत आहे, भारत दुर्गा मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. संघ प्रमुखांनी भारताला विश्व पटलावर स्थापन करण्यासाठी जीवन दिले. भारत माता, दुर्गा मातेचा संकल्प आला. भारत मातेने निवडले आहे. यातील देवशक्तींनी हा विचार केला असेल, केवळ एकमात्र भारत आहे जिथे भारत मातेचा जयकार लावला जातो. भारताच्या गौरवला पुन्हा स्थापित करण्यासाठी संघ प्रमुखांनी विडा उचलला. जेंव्हा भारतात कुठे आपत्ती येते तेंव्हा आरएसएसचा स्वयंसेवक तिथे जाऊन मदत करतो, असे ही बागेश्वर बाबा म्हणाले.
त्या वक्तव्याने खळबळ
“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा. काही दिवस आम्ही काहीच करू इच्छित नाही.” असे वक्तव्य फेकू बागेश्वर बाबानी केले.
“शिवरायांनी मन मोकळं केल्यावर रामदास स्वामी यांनी स्मितहास्य केले. ते म्हणाले की, ठीक आहे. तुम्ही आमचे कोण आहात? शिवाजी महाराज म्हणाले की आपले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही आमचे गुरू आहात. मग शिष्याचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामी यांनी विचारला. त्यावर जो गुरू आज्ञा देणार त्याचं पालन करण हे शिष्याचं कर्तव्य असल्याचे रामदास स्वामी म्हणाले. रामदास स्वामी यांनी मुकूट उचलला आणि महाराजांच्या डोक्यावर ठेवला. आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालवणार. तुम्हाला संचालन करायचं आहे.” असे इतिहासात कोठेही नोंद नसलेले आपल्या अकलेचे तारे तोडत थोथांड वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यानी या कार्यक्रमात केले. अशा थोतांडाला थांबवता आले असते कारण या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते.
शेवटी इतकेच म्हणावे लागेल या भाजपा सरकारने “कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट माझा”?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!