अपघातआपत्कालआरोग्यदू:खद वार्तामहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

परिचारीका ठरल्या देवदुत, नवजात बालकांचे प्राण वाचविले.

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २७ ऑगस्ट २०२६ करावे तेवढे कौतुक कमीच आणि वेळीच दाखवलेले धाडस..
सोमवारी पहाटे साडेतीन वाजताची ती वेळ. संपूर्ण अमरावती शहर गाढ झोपेत होते. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात परिचारिका ललिता कासदेकर नेहमीप्रमाणे अतिशय काळजीपूर्वक नवजात बालकांची शुश्रूषा करत होत्या. शांतता पसरलेली असतानाच अचानक एका व्हेंटिलेटरचा भीषण स्फोट झाला.
छतावरील आपत्कालीन वॉटर सिस्टीम जळून खाक झाली, व्हेंटिलेटरचे तुकडे-तुकडे उडाले आणि काही क्षणांतच संपूर्ण कक्षात काळोखासोबत धुराचे प्रचंड लोळ उठले. डोळ्यांसमोर मृत्यूचे तांडव दिसत असताना, स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या दोन परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस अमरावतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. स्वतःचे हात आगीत भाजले तरी चालेल, पण काचेच्या पेटीत बंद असलेल्या निष्पापांना मरू द्यायचे नाही, या एकाच जिद्दीने डफरीनच्या या देवदूतांनी तब्बल ३६ चिमुरड्यांचे प्राण वाचवले. या जिल्हा स्री रूग्णालय अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट होत नाही याला जबाबदार कोण उदया या निष्पाप नवजात शिशूचे प्राण गेले असते तर कुठून भरपाई केली असती. हा निष्काळजी पणा किती महागात पडला असता. अनेकदा हाच अनुभव सोसायटी, ऑफिस, हॉटेल्स, कारखाने येथे पहायला मिळतो, संबंधित अधिकारी वर्ग पगार कसला घेतात. या करीता नियमित फायर ऑडिट झालेच पाहिजे. त्रुटी आढळून आली तर परवाना रद्द करण्यात यावा तरच वचक बसेल अशा या निष्काळजीपणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!