अभिनंदनअमरावतीपूणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

तिवसा येथील प्रख्यात लेखक डॉ. रवी दलाल नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

प्रतिनिधी अविनाश गोंडाणे अमरावती दि. २९ ऑगस्ट २०२६ मराठी साहित्यातील एक प्रख्यात लेखक कथाकार म्हणुन रवी दलाल यांचे नाव अग्रस्थानी आहे
आता पर्यंत जवळपास चाळीस पुस्तके प्रकाशित झाली असुन काव्यसंग्रह कथासंग्रह, कांदबरया वैचारिक ग्रंथ लिहुन साहित्य क्षेत्रांत अमीट छाप सोडली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरीची दखल घेवून हरियाणा युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट पदवी बहाल केली.
तर दंगल या कथेने तब्बल सात देशातुन प्रथम क्रमांक पटकावला होता.
आता नामा कांदबरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली असून लंडन येथील आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडन येथील प्रख्यात संशोधक लेखिका डॉ. लुसिया हेन्री यांच्या तर्फे पुणे येथे डॉ. रवी दलाल यांना नेल्सन मंडेला पुरस्कार देण्यात आला Landan herord आंतरराष्ट्रीय मॅक्झिमच्या
मुखपृष्ठावर आतापर्यंत पहिल्यादाच मराठी लेखकाचा गौरव म्हणून स्थान देण्यात आले आहे. हा भव्य पुरस्कार सोहळा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स स्वारगेट पुणे येथे दि २४ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडला. महाराष्ट्रातील तिवसा गावातील लेखकाने आपल्या लेखनीचा ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्य जगताचा मोठा बहुमान आहे. त्याची लेखनशैली विचार, कथा समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत आहे.
रवी दलाल हे एक स्वाभिमानी लेखक असल्याने तिवसा/ काटोल येथील भाकरमिठु लोकाचे पंचतंत्र बिघडतो.
म्हणून साहित्य क्षेत्रांतील सर्वात उंच शिखरं पादाक्रांत केल्यानंतरही दखल घेतल्या जात नाही. जबरदस्त भाषण कौशल्य
असलेले रवी दलाल हे वैचारिक दृष्टा विद्रोही व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रातुन‌ आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला पुरस्कार मिळवणारे डॉ. रवी दलाल हे पहिले लेखक म्हणून Landan herord मॅक्झिमनी दखल घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!