पूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात दिव्यांग आधार विकास, राष्ट्रीय दिव्यांग अधिकार मंच, आणि मधु तारा दिव्यांग सेवा फाऊंडेशन यांच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय येथे निवेदन सादर..

प्रतिनिधी पुणे दि. २५ ऑगस्ट २०२६ काल छत्रपती संभाजी नगर येथील राज्यभर दिव्यांगांसाठी कार्य करणारी दिव्यांग आधार विकास संस्था, राष्ट्रीय दिव्यांग अधिकार मंच, आणि मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिव्यांगांच्या अनेक योजना तसेच नवीन जी आर मध्ये अनेक जाचक अटींना शिथिल करण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे सह आयुक्त संगीता डावखरे मॅडम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
दिव्यांगांच्या साठी प्रशासकीय स्तरातून विविध योजनांचा लाभ मिळावा. तसेच १८ वर्षे पुढील दिव्यांगाना आधार कार्ड मिळावे. त्यांना उदरनिर्वाह सक्षमीकरणासाठी जागा मिळावी. नवीन जी आर प्रणाली अनुसार काही जाचक अटींचा पुनर्विचार करून शिथिल करण्यात यावे. दिव्यांगांसाठी कार्यरत असणारे राज्य प्रशासन आणि दिव्यांग संस्था यांची कृती समिती गठित करून संस्थेचे पदाधिकारी यांची नियुक्ती व्हावी असे अनेक प्रश्नांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी १०० टक्के दिव्यांग असलेले छत्रपती संभाजी नगर येथील दिव्यांग आधार विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शेख नासेर सर, संस्थेचे सचिव सौ नाजनीन बेगम मॅडम, राष्ट्रीय दिव्यांग अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. झाकी मिर्झा बेग सर, तसेच मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. नितीनजी शिंदे यांनी निवेदन सादर केले.
या प्रसंगी मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख दिव्यांग विकास आधार प्रदेश अध्यक्ष श्री. हसन भाई मुलाणी सर, दिव्यांग विकास आधार संस्थेचे पुणे जिल्हा महिला प्रमुख सौ. महेरून पठाण मॅडम, श्री. शेख रबीब सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button