उत्सवधार्मिकपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रशहरसामाजिक

स्वाभिमानी प्रतिष्ठान ,आदर्श नगर, मोशीच्या वतिने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समापन सोहळा संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ नोव्हेंबर २०२६ स्वाभिमानी प्रतिष्ठान आदर्श नगर, मोशीच्या वतिने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समापन सोहळा ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी मंगलमय वातावरणात , मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीलाच सर्वांचे स्वागत पावसाने केले. वर्षावास सोहळ्यामध्ये वर्षा बरसने हे भाग्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे सोहळ्यामध्ये सगळीकडे मैत्रीचा व प्रेमाचा ओलावा दिसून आला.
“स्वाभिमानी पॅटर्न” राबवत कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुरेख केले होते.

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवा, खरे काय खोटे काय याची जाण व्हावी ह्या दृष्टीने “भारत विठ्ठलदास सरांचा” विज्ञानवादी ( अंधश्रद्धा निर्मूलन समिती) कार्यक्रम घेण्यात आला. त्याला बालमित्र आणि उपासक उपासकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वर्षावासात सामाजिक बांधिलकी म्हणून जाणीवपूर्वक हा विज्ञानवादी कार्यक्रम घेण्यात आला.
आदरणीय भदंत बुद्धघोष मेता महाथेरो यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना घेण्यात आली.
भंतेजींनी आपल्या वैचारिक धम्मदेशने मध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर सर्वांनी चालले पाहिजे. नुसते गळ्यात पंचशील टाकून चालत नाही तर तसे शिलाचे आचरण पण केले पाहिजे. असे सांगितले. तसेच स्वाभिमान प्रतिष्ठान मधील सभासदांनी स्वाभिमान जपला आहे असे आवर्जून सांगितले.
शेवटी चिवरदान ,धम्मदान ,
फळदान व धम्मपालन गाथा, भोजनदान होऊन. वर्षावास सोहळ्याची समाप्ती झाली
सोहळ्यासाठी वेगवेगळ्या संघातील, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वाभिमानी प्रतिष्ठानवर हृदयातून मैत्री करणाऱ्या तसेच (देहूरोड, किवळे , रावेत, वाकड, काळेवाडी, पिंपरी ) खूप लांबून उपस्थित राहणाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार व धन्यवाद.
सोहळा यशस्वी करण्यासाठी धम्म सेवक राजू कांबळे तसेच स्वाभिमानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष. नरेंद्र प्रगणे, उपाध्यक्ष रमेश वाघमारे, रमेश केदारी, गुणरत्न प्रगणे, अशोक तूपसौंदर, सुभाष वाकळे, निरंजन वानखडे, सुभाष आठवले, बुवासाहेब अहिवळे, शुद्धधन बागडे, मच्छिंद्र अष्टगे, शिवाजी कांबळे, गौतम भोसले, भगवान वानखेडे, गजानन वारुळे, ज्ञानेश्वर दांडगे, उमेश गायकवाड, सचिन पवार, कृष्णा ओव्हाळ साहेब, गंगाधर खडसे, जगदेव कांबळे, राहुल पांडे, जितू पांडे, गजानन शेगोकार, मनोज लोखंडे, प्रमोद वारुळे, उमेश रोकडे तसेच मायाताई प्रगणे, अर्चना कांबळे, मालनताई वाघमारे, वैशाली आठवले, मीना कांबळे, प्रज्ञा गवई, आजी शांताबाई पवार, अस्मिता वाकळे, सुचित्रा अष्टगे, भारती तूपसौंदर, कोमल प्रगणे, कांचन केदारी, पुनमताई ओव्हाळ, दीपा वानखडे, सरदार ताई, प्रीती रोकडे, छाया बोरसे, शोभाताई दांडगे, प्रमिला वारुळे, रूपाली रोकडे, पुनम पवार, अंकिता वाघमारे, अंजना विश्राम वाघमारे, जयश्री सावंत- माने, माया सुभाष प्रगणे, दीपा पांडे, कलावती वानखेडे, शितल प्रमोद वारुळे, सुजाता भिसे, सुजाता प्रगने, पायल भोसले, गौरी भोसले , आरोही भोसले तसेच स्वाभिमानी १८१८ झेनअल्फा टीम मधील कॅप्टन प्रणय आठवले, रोहन गवई, सम्यक वाघोदे, सम्यक तेलगोटे, प्रज्वल प्रगणे, अर्णव कांबळे, अजय रत्न वाकळे, पृथ्वीराज बोने, अभी पांडे, तन्वेष वाघोदे, आरव शेगोकार, अर्नेश वानखेडे, आयुष रोकडे, गौरव रोकडे, प्रसन्नजीत अंभोरे, सम्राट तूपसौंदर, प्रियांश प्रगणे यांनी विशेष वर्षावास सोहळ्यामध्ये परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button