पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तैलचित्र सन्मानपूर्वक दर्शनी भागात लावावे-चंद्रकांतदादा लोंढे

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २६ ऑक्टोबर २०२६ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी (अ.प.) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहे. मात्र, तैलचित्र लावलेले ठिकाणी एका कोपर्यात आहे. पुरूष आणि महिला स्वच्छतागृहाजवळ तैलचित्र लावल्याचे दिसत आहे. अशा ठिकाणी तैलचित्र लावणे योग्य नाही. हा पिंपरी-चिंचवड शहर घडवणार्या अजितदादांचा अवमान आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श. प.) सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतदादा लोंढे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदना द्वारे सांगीतले.
पिंपरी-चिंचवड हे नियोजबद्ध शहर घडवण्यात अजितदादांचा वाटा मोठा आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड या ग्रामीण आणि एमआयडीसी परिसराला बेस्ट सिटीचे स्वरूप दिले. प्रशस्त रस्ते, ग्रेडसेपरेटर, उड्डाण पुल निर्माण करत त्यांनी शहराची वाहतूक रहदारी सुरळीत करण्यास प्रोत्साहन दिले. बीआरटीएस मार्गाची निर्मिती केली. अनेक मोठे व महत्वपूर्ण प्रकल्प त्यांनी शहरात आणले. पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण करून देण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. सध्याचे बहुतांश लोकप्रतिनिधी हे त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष प्रेम करणार्या अजितदादा पवार यांचे तैलचित्र महानगरपालिका मुख्यालयात नुकतेच लावण्यात आले आहे. दर्शनी भागात म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राशेजारी त्यांचे तैलचित्र लावणे अपेक्षित होते. मात्र, अजितदादांचे तैलचित्र एका कोपर्यात लावण्यात आले आहे. तेथे जवळच पुरूष आणि महिला स्वच्छतागृह आहे. राज्यस्तरीय नेत्यांचे तैलचित्र अशा प्रकारे एका बाजूला तसेच, लक्ष जाणार नाही, अशा ठिकाणी लावणे महापालिका प्रशासनाला शोभत नाही. असा प्रकार करणार्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांवर तत्काळ कारवाई करावी. तसेच, अजितदादांचे तैलचित्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शेजारी सन्मानपूर्वक लावण्यात यावे. असे निवदनातून कळवल आहे.
यावेळी आमच्याशी बोलताना सदर निवेदन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ही पाठविण्यात आलेले आहे असे लोंढे यांनी सांगीतले.



