
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २४ ऑक्टोबर २०२६ आपल्या गुजराती उद्योजकासाठी काय पण?
भले उदया ऑक्सिजन विकत घ्यावा लागला तरी तो आडाणी व अंबानीच विकणार,,,
टोरेंट पीएसएच ३ प्रा. लि. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC), भारत सरकार यांच्याकडून फाईलला केंद्र सरकार कडून मंजूरी दि. १२/०१/२०२६ रोजी मेसर्स टोरेंट पीएसएच ३ प्रायव्हेट लिमिटेड यांना “साईडोंगर १ कर्जत ओपन लूप उदंचन जलविद्युत प्रकल्प (३००० मेगावॅट)” या प्रकल्पाकरिता ३७७ हेक्टर क्षेत्रफळासाठी पर्यावरण मंजुरी (Environmental Clearance – EC) प्रदान करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प गावः पाली तर्फ कोथल खलाटी, साईडोंगर, पोटल, आंबोट आणि भालिवडी गावे बाधित आहेत .
१-प्रकल्पाची क्षमता –
प्रस्तावित साईडोंगर १ कर्जत उदंचन जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३००० मेगावॅट (९ x ३०० मेगावॅट २ x १५० मेगावॅट) इतकी आहे.
२-जमीन):
या प्रकल्पासाठी एकूण ३७७ हेक्टर जमीनीसाठी सरकारने कंपनीला हमी दिली आहे.
३-पाणी (Water):
प्रकल्पासाठी पाण्याची एकूण आवश्यकता प्रारंभिक जलभरणासाठी २३ दशलक्ष घनमीटर असून, वाष्पीभवन व्यय भरून काढण्यासाठी वार्षिक ३ दशलक्ष घनमीटर इतकी आवश्यकता आहे. *~सदर पाणी पेज नदीच्या स्वयं-पाणलोट क्षेत्रातून प्राप्त केले जाईल.
(म्हणजे हे टाटा प्रकल्पाचे पाणी वापरणार?)
मेसर्स टोरेंट पीएसएच ३ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला MoEF&CC, भारत सरकार व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) ने केंद्र सरकारच्या कृपेने देखील तशी मंजुरी दिली आहे.
तसेच पर्यावरण मंजुरीची प्रत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत, नगरपालिका व संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये सादर करण्यात आलेली आहे.



