
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ ऑगष्ट २०२५ महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आज पवना धरण परिसरात पवना माईचे जलपूजन करण्यात आले धरण आता ९० टक्के भरलेले आहे मे महिन्यापासून पाऊस अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे त्यामुळे मावळ परिसरात देखील सगळीकडे हिरवळ दाटली आहे. मावळकरांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे. परंतु पिंपरी चिंचवडकर यांचा पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी अवस्था पिंपरी चिंचवड करांची झाली आहे. काही मान्यवरांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. तुम्हाला रोज पाणी मिळेल. परंतु आता सत्तेत बसून कितीतरी महिने झाले, तरीदेखील पिंपरी चिंचवड करांना पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला पाच आमदार आहेत पण पाणी प्रश्नावर कोणतेही आमदार बोलायला तयार नाहीत त्यामुळे शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा दररोज सकाळीच पाणी मिळावे संध्याकाळचे पाणी बंद करावे यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार आहोत याप्रसंगी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपालीताई आल्हाट, प्रदेश सरचिटणीस मा. नगरसेविका प्रियांकाताई बारसे, शहर समन्वयक जयमाला कदम, तायरा सय्यद, अर्चना बारकुल, कल्पना घाडगे, कमल धाईंजे, सोनल पासलकर, पुष्पा गोपाळे, राणी थोरात, शहर उपाध्यक्ष विनोद धुमाळ, सचिन निंबाळकर, संतोष म्हात्रे पुणे जिल्हा समन्वयक युवा सेना, गौतम लहाने युवा सेना उपशहर प्रमुख हे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



