पाणीबानीमहाराष्ट्रविशेषसामाजिक

दुष्काळानंतरचा पूर…मराठवाडा पुन्हा उद्ध्वस्त:- युवराज दाखले.

प्रतिनीधी सतिश वि. पाटील मुंबई दि. २९ सप्टेंबर २०२५ मराठवाड्यातील जगजीवन विस्कळीत, आशा वाहून गेल्या, अश्रू पुसा, आधार द्या, मराठवाडा सरकारकडे ओल्या नयनांनी टक लावून पाहतोय मराठवाडा.. नेहमी दुष्काळ, कोरडवाहू शेती आणि तहानलेली माणसं या प्रतिमेतून ओळखला गेलेला विभाग… वर्षानुवर्षे आकाशाकडे डोळे लावून बसणारा शेतकरी यंदा मात्र वेगळ्याच संकटाला सामोरा गेला. आकाशातुन कोसळलेल्या पावसाने थैमान घातले. नद्या, ओढे, नाले तुडुंब भरले, पण त्याचबरोबर शेतजमिनी वाहून गेल्या, जनावरं वाहून गेली, घरे उध्वस्त झाली आणि जगण्याचा पायाच हादरला.
शेतकऱ्याचे आयुष्य कधी दुष्काळाने पोखरले तर कधी पुराच्या तडाख्याने मोडून काढले. ज्यांच्यासाठी दोन पावसाच्या सरी म्हणजे आयुष्याची शिदोरी होती, त्याच पावसाने आज सर्व काही वाहून नेले. शेतमाल पाण्यात गाडला, कुटुंब उघड्यावर आले, आणि भविष्यातील आशा धूसर झाल्या.
या आपत्तीने मराठवाड्याचा जीवघेणा आक्रोश आज पुन्हा एकदा बाहेर काढला आहे. सरकार, नेते, अधिकारी यांनी हे लक्षात ठेवावे की हे केवळ नुकसान नाही हे हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्धवस्त होणे आहे, असं स्पष्ट मत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले अशावेळी फक्त पंचनामे किंवा कागदी मदत नव्हे, तर त्वरित, सरसकट आणि ठोस मदत गरजेची आहे. ही काळाची गरज आहे. १०० टक्के शेतकरी कर्जमाफी, उध्वस्त झालेल्या शेतकरी व जनतेसाठी तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच पुनर्वसन, जनावरांसाठी चारा व अन्नधान्याचा पुरवठा हमखास झालाच पाहिजे.
एकेक करून मदतीचे हात पुढे येत आहेत, समाजानेही आपले कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली आहे. परंतु शासनाने या वेदनेला फक्त आकडेवारीत मोजू नये, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे कार्य प्रत्यक्षात दाखवावे. मराठवाडा हा देशातला पोटभरणारा भाग आहे. त्याला दुष्काळाच्या छायेतून आणि पुराच्या तडाख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाने ठोस धोरण ठरवायला हवे. अन्यथा, शेतकरी आत्महत्या हा शाप पुन्हा वाढेल, आणि पोटभर अन्न देणारा शेतकरीच उपाशी राहील.
दाखले म्हणाले की, आज प्रश्न फक्त मदतीचा नाही, तर मानवतेचा आहे. मराठवाडा ओरडतो आहे सरकार हो… या अश्रूना किंमत द्या… हा आक्रोश ऐका… जगण्याला आधार द्या. शेतकऱ्यााच्या डोळ्यातील अश्रृंना किंमत द्या.
कालपर्यंत आभाळाकडे पाहून पाऊस येईल का? अशी आस लावलेला मराठवाडा, आज मात्र पावसाच्या तडाख्यात होरपळला आहे. आयुष्यभर दुष्काळाच्या सावलीत जगलेल्या या मातीतल्या माणसांना यंदा वेगळाच शाप लाभला पावसाचा, पूराचा. शेताच्या बांधावर उभं राहून जगण्याची शिदोरी पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं पीक पाण्यात गाडलं. चराऊ कुरण वाहून गेलं. घर, घरातिल माणसे, मूलाबाळाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांसकट जगणं वाहून गेलं. घराच्या कडेलोटावर उभी असलेली झोपडी पुराच्या लाटांनी वाहवून नेली. आयुष्यभर जपलेली शिदोरी
एका रात्रीत संपली. मराठवाडा हा नेहमी दुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जातो. पण यंदा हा प्रदेश पाण्याने बुडाला अशी काळजाला टोचनारी कहाणी सांगतो आहे. दुष्काळाने रडवलेला शेतकरी आज पुरात रडतोय. सरकारच्या मदतीकडे टकलावून पाहतोय असं मत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!