अपघातमहाराष्ट्रविशेष
शेवगांव बस स्थानकात वृद्ध महिला प्रवासी मथुरा बाई मधुकर पटारे यांचे एस.टी.च्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू ..

विषेश प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. २७ मार्च २०२५ सुसरे तालुका पाथर्डी येथील मथुराबाई मधुकर पटारे वय वर्ष ८० या एसटी बसने संभाजीनगर येथे नातेवाईकाकडे नातवासमवेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. काल सकाळी शेवगाव एसटी स्टँडवर सकाळी आठच्या सुमारास मढी ते संभाजीनगर पैठण आगार या बसच्या मागच्या टायराखाली खाली आल्याने मृत्यू झाला ही घटना शेवगाव स्टँडच्या आवारात घडली. पैठण आगाराच्या गाडीचा नंबर एम. एच. २० बी. एल. ११६२ असा आहे. शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पोलीस हवालदार आबासाहेब गोरे यांनी त्यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम साठी पाठवला व त्यानंतर अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला गेल्याचे समजत.



