अवैधऔद्योगीकपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रसामाजिक

भोसरी विभाग पुणे येथील कार्यरत असलेले भ्रष्ट कार्यकारी अभियंता श्री. अतुल देवकर यांना तात्काळ निलंबित करा-रमेश गायकवाड

म्हणे पुणे तिथे काय उणे,
पिंपरी-चिंचवड झाले भ्रष्टाचारात जुणे!

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३  फेब्रुवारी २०२६ श्री. रमेश गायकवाड यांनी दि. २३ जानेवारी २०२६ रोजी मा. व्यवस्थापकीय संचालक, म.रा.वि.वि. कंपनी लिमिटेड. महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा, मुंबई यांना दिलेल्या निवेदनात पिंपरी चिंचवड येथील भोसरी विभाग पुणे अंतर्गत महा भ्रष्टाचार उघड केला आहे.
सविस्तर माहिती
भोसरी विभाग पुणे येथील कार्यरत असलेले भ्रष्ट कार्यकारी अभियंता श्री. अतुल भिमराव देवकर यांना तात्काळ निलंबित करून खाली नमूद केलेल्या आरोपाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी.
कार्यकारी अभियंता श्री. देवकर यांनी भोसरी विभागाचा पदभार स्विकारल्यापासून भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे.
याची तपशिलवार माहिती खालील प्रमाणे.
माहे ०१ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीमध्ये पिपरी चिंचवड महानगरपालिका व पी. एम. आर. डी. यांनी संयुक्त कारवाई करून भोसरी विभागातील
१) जाधववाडी, २) कुदळवाडी, ३) चिखली, ४) पवारवस्ती या विभागातील सुमारे ६०० एकर जमिनीवर व्यापारी बांधकाम व शेड आणि औद्योगिक बांधकाम व कंपण्यांचे शेड संपूर्णपणे भुईसपाट केले आहे. त्या ठिकाणी अंदाजे अडीज ते तीन हजार वीज वाहक होते व महावितरण कंपणीचे सदरील ठिकाणी कोटयावधी रुपयांची लोखंडी मालमत्ता होती. सदरील मालमत्ता महावितरण कंपनीचे भोसरी विभागातील भांडारगृह येथे जमा करणे बंधनकारक होते, परंतू कार्यकारी अभियंता श्री. देवकर यांनी अधिकाराचा व पदाचा गैरवापर करुन ही लोखंडी मालमत्ता परस्पर विल्हेवाट लावून रक्कम स्वतःच्या खिशात घातली आहे.

मालमत्तेचा थोडक्यात तपशिल
१) एच.टी. लाईनचे लोखंडी विद्युत खांब, विद्युत वाहिन्या, खांबाला दिलेले स्टॅंड, स्टिल, मिनी बॉक्स, फिडर पीलर, फोर वे पीलर (सर्व लोखंडी )
२) एल.टी. लाईनचे लोखंडी विद्युत खांब व विद्युत वाहिन्या असा ६०० एकरवरील महावितरण कंपणीने तयार केलेली विद्युत जाळे याची संपूर्ण मालमत्ता भोसरी विभाग भांडारगृहात जमा न करता परस्पर विकून (विल्हेवाट लावून) रक्कम स्वतःच्या खिशात घातली आहे.
३) दिगंबरा डेव्हलपर्स मारवे सर्व्हे नं. ४६, देहूगांव येथे बांधकाम व्यवसायिक १३ विज मीटर कोणत्याही प्रकारची मंजूरी न घेता देण्यात आलेले आहेत.
ग्राहक क्र. २१२३७१४१८७४९ बी. यु. ४६७६.
४) रॉयल लॅण्ड डेव्हलपर्स, ओवी तिर्थ होम्स, देहूगांव या बांधकाम व्यवसासिकास नवीन विज योजनेअंतर्गत विद्युत रोहित्र दिले आहे व विद्युत रोहित्र बसविण्यासाठी लागणारी जागा बांधकाम व्यवसायिकाकडून न घेता आर्थिक तडजोड करुन विद्युत रोहित्र सरकारी जागेवर बसविण्यात आलेले आहे.
५) श्री शंकर हाइटस्, प्लॉट नं. १०, १५ सर्व्हे नं. ४१/५ साईसृष्टी नगरी, देहूगांव पुणे या ठिकाणी नवीन विज पुरवणी अंतर्गत मंजूरी असताना बांधकाम व्यवसायाकडून विद्युत रोहित्रास लागणाऱ्या जागेसंदर्भात आर्थिक तडजोड करुन विद्युत रोहित्र न बसवता २६ वन बी .एच.के, फ्लॅटमध्ये २६ विज ग्राहकांस अधिकाराचा गैरवापर करुन विज मिटर देण्यात आलेले आहेत.
६) सुजित एन्टरप्रायजेस ग्राहक क्र. १७५८०६८८८२६०८ बी. यु. ४६७६ या विज ग्राहकास देखील नवीन विज पुरवणी अंतर्गत मंजूर झालेला असताना जागेअभावी आर्थिक तडजोड करुन ४० एच.पी. विजपुरवठा देण्यात आलेला आहे.
७) मे. संत इंडस्ट्रीज, प्रोप्रा. दिलीप मधुकर झेंडे, सर्व्हे नं. ३४/१डी, गाथा मंदीर, बायपास रोड, देहूगांव, पुणे या विज ग्राहकास १९ एच.पी. /औद्योगिक विज पुरवठा मंजूर करुन विद्युत रोहित्र बसवून चालू केले आहे, परंतू विद्युत रोहित्रावर संत इंडस्ट्रीज या ग्राहकास विद्युत पुरवठा देवून विज बिल चालू न करता दुसऱ्या विद्युत ग्राहकास विज मीटर देण्यात आलेले आहेत. पंरतू नवीन विज पुरवठा योजनेअंतर्गत ज्या नावाने विद्युत रोहित्र मंजूर झाला व बसवून चालू केला, परंतू संबंधित विजग्राहक चालू करण्यात आलेला नाही.
असे अनेक भ्रष्टाचार भोसरी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता श्री. अतुल भिमराव देवकर यांनी केली आहे व करीत आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करुन खातेनिहाय चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे तक्रारी अर्जदार रमेश गायकवाड यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.
वरील सर्व आरोपांचे पुरावे जी.पी.एस. कॅमेऱ्याने काढलेले छायाचित्र लोकेशनसहित जोडलेले आहे.
सोबत :-
१) ईमारतीचे फोटो ( जी.पी.एस.)
२) संत इंडस्ट्रीज यांची एन.एस.सी. मंजूरी पत्र           

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!