याला जबाबदार कोण? बाहेरील लोंढे नियंत्रित होणे जरुरीचे आहे..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. 12 फेब्रुवारी 2026 बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला डोंबिवलीतील सोहम कटरेचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण? गर्दी? की रोज रोज अमर्याद वाढणारे परप्रांतीय लोंढे?
बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम सचिन कटरेचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला असून जागीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सोहम डोंबिवली येथे राहत होता आणि कळव्यातील मनिषा विद्यालय येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे डब्यांची संख्या १२ करा १५ करा किंवा १८ करा काहीही उपयोग होणार नाही? कारण जोपर्यंत राज्याच्या बाहेरून येणारे परप्रांतीय लोंढे थांबणार नाहीत तोपर्यंत स्थानिक नागरिकांना असेच रोज मरावे लागणार आहे? राज्याच्या बाहेरून येणारे परप्रांतीय लोंढे थांबवण्यासाठी सरकारने स्थलांतरित कायदा पारित केला पाहिजे. हा एकमेव पर्याय आहे?



