आपत्कालपोलिसमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

मुबंईच्या डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. 07 फेब्रुवारी 2026 डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाच्या माध्यमातून दहावी, बारावीच्या परिक्षार्थीचा प्रवास सुकर व्हावा, ते कोठे ही ट्रॅफीकमध्ये अडकल्यास त्यांना तात्काळ मदत मिळून परिक्षा केंद्र गाठता यावे यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने विशेष बाईक रायडर्सची सुविधा देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असून यावर संपर्क साधल्यास त्या त्या भागातील रायडर्स विद्यार्थ्यांना तेथून घेऊन परिक्षा केंद्रावर सोडतील.

माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर व माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफिक रायडर्स संपूर्ण ठाणे शहरात कार्यरत असतील. अधिक माहितीसाठी डोंबिवली शहर वाहतूक विभाग क्रमांक – 8655654184 वर संपर्क करावा असे आवाहन डोंबिवली शहर वाहतूक विभाग प्रभारी अधिकारी श्रीराम पाटील यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!