आमदार महेश लांडगे साहेब, बाँडद्वारे भीक मागण्याची परिस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती कोणी आणली ?

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ जून २०२५ साधारण दोन दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांच्या भाषणावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहर जिल्हाचे मूख्यप्रवक्ते माधव धनवे पाटील यांनी काढले वाभाडे यावेळी धनवे पाटील लिहितात की माननीय भोसरी विधानसभा आमदार Mahesh Landge साहेब नमस्कार, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस CMO Maharashtra
साहेब यांच्यासमोर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास कामांसंदर्भात केलेले भाषण आम्ही ऐकले.
आपण दिव्यांग भवन बांधले याचा उल्लेख केलात, सर्व दिव्यांग बंधूंच्या वतीने आपले आभार.
धन्यवाद आपण शे—पाचशे कोटीची इमारत बांधल्याबद्दल.
पण गेल्या आठ वर्षांमध्ये, भाजपच्या पाच आणि प्रशासनाच्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेच्या लक्षात राहतील अशी कोणती मोठी दहा कामे झाली ?
पालिकेचे दरवर्षीचे सात हजार कोटी रुपयांचे बजेट असते.
८ वर्षे x ७००० = ५६००० कोटी रुपयांचे आपण केले काय ? आपण याचा हिशोब द्यावा,
कोणत्याही राजकीय पक्षाला नाही तर याचा हिशोब जनतेला द्यावा.
तुमच्या अधिपत्याखाली असणारी महानगरपालिका किरकोळ कामांसाठी PCMC Smart Sarathi दोनशे कोटी रुपयांचे बॉण्ड काढत आहेत. वर्षाचे 7000 कोटी रुपये कमी पडत आहेत का ?
बाँडद्वारे भीक मागण्याची परिस्थिती पालिकेवरती कोणी आणली ?
ही परिस्थिती पिंपरी चिंचवड भाजपने आणली.
माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब (Ajit Pawar) आपण यावरती चौकशी लावावी, गेल्या आठ वर्षाच्या खर्चासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी.
कुत्र्यांच्या नसबंदीतही भाजपने भ्रष्टाचार केला आहे.
बिचाऱ्या वारकऱ्यांनी केमिकल युक्त फेसाच्या नदीमध्ये आंघोळ केली. अरे रे… रे. रे …
राजकीय नेत्यांनी कोणासोबत फुगडी घातली यात पिंपरी चिंचवडकरच काय महाराष्ट्रातील कोणत्याही कॉमन मॅनला त्यात रस नाहीये. असो, पण पवनामाई आणि इंद्रायणीमाईने शेवटी स्वतःच पावसाच्या पाण्यात सर्व जलपर्णी वाहून नेऊन सर्वांवर उपकारच केले आहेत.
दरवर्षी किमान १०० कोटी जलपर्णी साफसफाई साठी खर्च केले जातात. ते पैसे कुठे जातात ? स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट भ्रष्टाचार ?
पवना बंदिस्त पाईपलाईन योजना ? पाण्याची चव गेले पंधरा दिवस पार बिघडली आहे.
माननीय विधानसभा उपाध्यक्ष (Anna bansode) अण्णा बनसोडे साहेब आपण पाणी या विषयावर लक्ष घालावे. २४ तास पाणी देणार अशा वल्गना अनेक पक्षांनी केल्या पण तीस लाख पिंपरी चिंचवड करांना फक्त घंटाच मिळाली वाजवायला.
या सर्वांमध्ये भ्रष्टाचार दडलेला आहे. लांडगे साहेब आपण पैलवान आहात, कोणालाही अंगावर घ्या नाहीतर शिंगावर घ्या पण ५६ हजार कोटी रुपयांचा हिशोब जनतेला द्या ही नम्र विनंती.



