प्रतिनिधी-दिनांक 04 एप्रिल 2023.
सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना (महा. राज्य) या सामाजिक संघटनेच्या जवाबदार पदाधिकारी, कार्यकर्ते, व सभासद यांना सूचित करण्यात येते की,
११ एप्रिल 2023 रोजी क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा जयंती सोहळा साजरा होत आहे .त्याकरिता महामानव यांना अभिवादन, आपल्या या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या वर्षी आगळे वेगळे करण्याचे ठरवले आहे .त्यासाठी सर्वांची उपस्थितीती आवश्यक आहे. महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी आणि केंद्र आणि राज्यातील सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या या सामाजिक संघटनेने आयोजित केलेला आहे.
आपल्या सोबत मूलनिवासी संघ ,पुणे ,व महाराष्ट्र राज्य आहे. तसेच बामसेफ संघटना आहे. व इतर ही संघटना आपल्याला मदतीला असतील
तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग देऊन, उपस्थिती नोंदवा. असे प्रा. बी. बी. शिंदे यांनी बोलताना सांगीतले
*कार्यक्रमाची रूपरेषा*
विषय :- महात्मा जोतीरावफुले यांना अभिवादन .
स्थळ :- पुणे .
मार्ग :- भिडे वाडा ते फुले वाडा ,पायी मार्च .
दिनांक :—११ एप्रिल 2023 रोजी ,सकाळी १० वाजता ,भिडे वाडा पुणे येथे ,आपण वेळेत, न चुकता हजर रहाणे .ही नम्र विनंती आहे .
कळावे आपला :–प्रा. बी. बी. शिंदे .व सहकारी



