
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑगस्ट २०२५ ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक या ठिकाणी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त मा.अण्णासाहेब बोदडे व जनसंपर्क अधिकारी मा. प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीचे निमंत्रक मा. बापूसाहेब गायकवाड मा. बाळासाहेब रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर समता सैनिक दल तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



