महाराष्ट्रसामाजिक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती बस स्थानकास द्यावे ही मागणी गेल्या १५ वर्षा पासूनची..

प्रतिनिधी बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून आम्ही गेल्या १५ वर्षा पासून मागणी करत आहोत परंतु बारामतीचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र सरकारने आमच्या मागणीची गंभीर पणे दखल न घेतल्याने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व मा. किरणजी घोंगडे साहेब महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष मा. धुराजी शिंदे साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बस स्थानकाचे नामांतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती केले आहे त्या वेळी मा. प्रशांत विष्णू सोनवणे पुणे जिल्हा महासचिव, मा. गणेश मारुती चव्हाण पुणे जिल्हा अध्यक्ष, सौ. कांचन भोसले पुणे जिल्हा युवती अध्यक्षा, मा. उमेश साळवे बारामती तालुका उपाध्यक्ष, मा. हनुमंत बनसोडे इंदापूर तालुका अध्यक्ष, व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!