अभिवादनदेश-विदेशपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शहीद भगतसिंग हे थोर क्रांतिकारक, महान देशभक्त होते : प्रकाश जाधव

वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..

प्रतीनिधी पिंपरी-चिंचवड, दि. ३० सप्टेंबर २०२६ शहीद भगतसिंह हे केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारक नव्हते तर स्वातंत्र्याचा लाभ समाजातील शोषित, वंचित आणि सर्वसामान्य घटकांना मिळावा या विचारांचे ते पुरस्कर्ते होते. ते अंधश्रद्धाविरोधी, विज्ञानवादी विचारांचे आणि नास्तिक होते. पत्रकार, लेखक, विचारवंत तसेच थोर क्रांतिकारक आणि महान देशभक्त म्हणून त्यांचे कार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सुनील जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, निवृत्त मुख्याध्यापक व प्रसिद्ध व्याख्याते अरविंद जगताप, अशोक सातपुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश जाधव म्हणाले की भगतसिंह यांचे संपूर्ण कुटुंबच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. कुटुंबातील देशभक्तीची प्रेरणा आणि तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळे ते विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना अनेक वेळा कारावासही भोगावा लागला.
देशासाठी त्यांनी हसत-हसत फाशी स्वीकारली मात्र अन्याय आणि गुलामगिरीसमोर त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही. त्यांच्या त्यागातून आणि विचारांतून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी असेही प्रकाश जाधव यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अरविंद जगताप यांनी केले तर आभार सतीश काळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button