
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभ प्रसंगी आंदोलनाची आक्रमक भूमिका..
प्रतिनिधी मुंबई दि. ०३ ऑक्टोबर २०२६ महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्म सिटी) ५९ व्या वर्धापन दिना निमित्त ‘सुवर्ण महोत्सवी शुभारंभ’ सोहळा दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता स्टुडिओ नंबर ०१, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर, गोरेगाव, मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन महनीय व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याच महत्त्वपूर्ण पार्श्वभूमीवर, मराठी चित्रपट सृष्टीच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन’ या अभियानाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज नामवंतांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते श्री. महेश कोठारे, अभिनेते श्री. विजय पाटकर, श्री. जयंत वाडकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी या आंदोलनाला आपला मोलाचा व जाहीर पाठिंबा दिला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीसमोरील विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी ‘मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन’ आक्रमकपणे पुढे जात असून, या आंदोलनाचे अध्यक्ष श्री. प्रसाद इंगवले यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवर व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते:
यावेळी आंदोलनाचे उपाध्यक्ष हर्षल भिसे पाटील, कार्याध्यक्ष सचिन पिंपरीकर, सतीश आंबर्डेकर, सागर खडके, अक्षय क्षीरसागर, श्रीकांत उमरीकर, अमोल निरगुडे, उमेश पंडित, संकेत राऊत, डॉ. भगवान कांबळे, सुनील जाधव, संकेत शिर्के, सुधीर शहाजी उमाप, परते पुष्पा, जान्हवी धिंदळे, रामचंद्र शिवराम साळुंखे, जगदीश चव्हाण, प्रशांत बोगम, स्वप्नील कापसे, मनोज हरिश्चंद्र थोरात, गणेश तळेकर, जितेंद्र वाईकर, रवी भोंगाडे, शामराव पवार, राजू माने, अजय गोपीवार, मनोहर आग्राडे, सीमा अहिरे, भगवान आत्राम, जोसेफ अमोलिक, ज्वाईसी अमोलिक, वैशाली अमोलिक, कृष्णांत खरे, संकेत बने, स्वरा चव्हाण, विजय गायकवाड, धनंजय जाधव, भरत गांगुर्डे, योगेश पंडित, अशोक ढवळे, आशिष देशपांडे आणि समीक्षा गिसरे आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी चित्रपट सृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून, दिग्गज कलाकारांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.



