मुंबईतील गरिबांच्या घरांवर हातोडा चालून बेघर करू नका! महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे!..

प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. २९ सप्टेंबर२०२६ मुंबईतील ३९ हजार १११ झोपड्यांवर तोडक कारवाई होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. गरिबांच्या घरांवर हातोडा चालवून त्यांना बेघर करू नका आणि अशा कोणत्याही कारवाईला स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.
मात्र, ३९ हजार १११ झोपड्यांवर तोडक कारवाई करण्याचे कोणतेही आदेश महापालिका प्रशासनाने दिलेले नसल्याचे मा. आयुक्तांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून केवळ नियमित स्वरूपाची कारवाई केली जात असून, या झोपड्यांवर कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मा. आयुक्तांनी स्वतः स्पष्ट केल्याप्रमाणे, या झोपड्यांवर तोडक कारवाई केली जाणार नाही. मात्र, महापालिका प्रशासनाने भविष्यात अशी कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करेल. श्रीमंतांसाठी एक नियम आणि गरीबांसाठी दुसरा नियम, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही.
दरम्यान, मा. महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या कारवाईबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि महापौर यांच्यात या महत्त्वाच्या विषयावर पुरेसा समन्वय आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. विरोधकांनी व इतर पक्षांने हा मुद्दा पालिकेत उचलून धरल्याने काही काळ गदारोळ माजला, यावर चर्चा केली जाईल अशी माहिती मिळत आहे त्यानंतर पालिकेने असे कोणतेही आदेश दिले नाहीत तसेच मा. महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्पष्ट केले.



