उत्सवक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेष

२०२६ टी २० विश्वचषक भारताचा न्युझीलंडवर विजय! भारत तिसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कपचा मानकरी ठरला.

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. ०९ मार्च २०२६ काल झालेल्या
२०२६ टी २० विश्वचषक फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५६ धावांचे मोठे आव्हान उभे केले होते, हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.
नाणेफेक (Toss) न्यूझीलंडने जिंकला, प्रथम गोलंदाजी निवडली.
भारताची फलंदाजी: जबरदस्त धावसंख्या उभी केली.
अंतिम सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम १९ षटकांत १५९ धावांत गारद झाली. टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धावांच्या फरकाने मिळालेला हा सर्वात मोठा विजय ठरला.

सॅमसन-अभिषेक-ईशानचा झंझावात
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची तुफानी भागीदारी केली. अभिषेक शर्माने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा करत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन शतकाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला, त्याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या.

सामनावीर जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा खेळ गुंडाळला
२५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली.
न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याने २६ चेंडूत ०२ चौकार आणि ०५ षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ ७२.धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. डॅरिल मिचेलने ११ चेंडूत १७ धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने ३५ चेंडूत ४३ धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजयाच्या जवळ पास ही घेवून गेली नाही. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलने ३ विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणाच मोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!