
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १५ मार्च २०२६ जालन्यात वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई टाळण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षक विजय राठोड आणि जाधव या कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून रंगेहात पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जालन्यात कारवाई टाळण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली
एसीबीने सापळा रचून पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठं मोठ्या अधिकाऱ्याकडून सध्या लाच घेतल्याची प्रकरण उघड होत आहेत. गुन्हेगारांचा गुन्हा लपवण्यासाठी, तसेच कारवाईपासून मुक्तता मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो करोडो रुपये अधिकारी वर्ग उकळतं असल्याचे पाहायला मिळते आहे. अशातच आता जालन्यात पोलीस कर्मचाऱ्याने वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील मंठा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एक वाळूचा ट्रक जप्त केला होता. या वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याने ५० हजारांची लाच मागितली. याप्रकरणी टिप्पर मालकाने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाला माहिती दिली.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. ठरलेल्या प्लॅनिंगनुसार जाळं टाकून पथकाने पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि पोलीस कर्मचारी रवी जाधव या दोघांना तक्रारदाराकडून लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने धाड टाकली आणि दोघांना रंगेहाथ पकडत त्यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी एसीबी पुढील तपास करत आहे. दरम्यान हे लाच घेण्याच्या घटना कधी थांबणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



