ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल मंत्री संजय शिरसाठ यांनी केलेले विधान चुकीचे व अज्ञानीपनाचे आहे.- युवराज दाखले

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ मार्च २०२६ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल कसलीही समज नाही.
ते अनुसूचित जातीचे असून देखील त्यांना सामाजिक न्याय काय तेच समजलेलं नाही. त्यांच्याकडून बौद्ध आणि अनुसूचित जातीला मोठी अपेक्षा होती पण दुर्दैवाने त्यांनी सामाजिक अन्यायाची भाषा सुरू केलेली आहे.
खोट्या ॲट्रॉसिटी दाखल होतात हे त्यांचं विधान चुकीचे आहे. त्यांच्या अशा विधानामुळे कायद्याचा धाक संपवून दलित आदिवासी धोक्यात येऊ शकतात.
शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज त्यांच्या या भूमिकेचा जाहीर निषेध करत असून तत्काळ त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी राज्य सरकारकडे शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांना कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही त्यांनी तात्काळ पद सोडावे.
ॲट्रॉसिटी ऍक्ट हे एससी/ एसटीचे सुरक्षा कवच आहे. आणि हे कवच तोडून ते काय सिद्ध करू इच्छीतात. त्याच्या वर तात्काळ पद मुक्तीची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे! असे शिवशाही व्यापारी संघाचे युवराज दाखले यांनी या वेळी
सांगीतले.



