महाराष्ट्रात आता “म” मराठीचा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची भेटनार मुदत..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २९ एप्रिल २०२६ रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मंत्रालयात परिवहन विभागाची बैठक पार पडली असून, यात चालकांना दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत द्यायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले. सुरुवातीला १ मे २०२६ पासून हा नियम लागू करण्याचे नियोजन होते, मात्र आता त्याची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, मराठी न आल्यास परवाने रद्द करण्याबाबतच्या चर्चांवर बैठकीत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चालकांना भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि त्या काळात कोणतीही कठोर कारवाई होणार नाही. मात्र, मराठी शिकणे आवश्यकच असल्याचे सरकारने ठामपणे सांगितले आहे. चालक संघटनांच्या मागण्या आणि संपाच्या इशाऱ्यांचा विचार करून हा निर्णय घेतला जात असल्याचेही बोलले जात आहे. तसेच, स्थानिक भाषेचा आदर राखत सेवा देणे गरजेचे असल्याचे मंत्री यांनी अधोरेखित केले असून, भविष्यात नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे संकेत दिले आहेत.हे पाहण गरजेचे आहे, सरकार खरच निर्णयावर ठाम आहे का रिक्षा, टॅक्सी चालक, मालक यांना भ्रमीत करीत आहे. मग आधीच का बोलून झाले जीआर काढला म्हणून मग लगेचच माघार का घेतली जाते. ही राजकीय खेळी तर नाही ना? जर रिक्षा, टॅक्सी परवाने परराज्यातील लोकांना दिले आहेत याला जबाबदार असणारे अधिकारीवर्ग व संबंधित यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.



