आंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रवाहतूक कोंडीविशेषशहरसामाजिक

डांगे चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न; संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन स्थगित..

वाहतूक पोलिसांचे लेखी आश्वासन.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ ऑगस्ट २०२६ वाकड रोडवरील डांगे चौकात दररोज निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडने पुकारलेले धरणे आंदोलन वाहतूक पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी वाहतूक शाखेला लेखी जबाब देत आंदोलन स्थगित केल्याचे कळविले. डांगे चौकातील वाहतूक कोंडीबाबत यापूर्वी निवेदन देऊनही अपेक्षित कारवाई न झाल्याने २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता वाहतूक पोलीस उपायुक्त, चिंचवडगाव यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपयुक्त सत्यजित आदमाने यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले यावेळी वाकड वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बापू ढेरे आणि संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष गणेश देवराम उपस्थित होते.

बैठकीत डांगे चौकातील वाहतूक कोंडीबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अधिक अंमलदार तैनात करण्यात येत आहेत असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले.

या आश्वासनानंतर समाधान व्यक्त करत सतिश काळे यांनी २१ ऑगस्ट रोजीचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचा लेखी जबाब दिला. चर्चेने समाधान झाले असून या बाबत कोणतीही तक्रार नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button