अभिनंदनउत्सवनाशिकमहाराष्ट्रमूंबईविशेषशुभेच्छासामाजिक

नाशिकमध्ये २५ ऑक्टोबरला ‘अहिल्या रत्न पुरस्कार’ सन्मान सोहळ्याचे आयोजन..


प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई नाशिक, दि. १९ ऑक्टोबर २०२६ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी, नाशिकच्या वतीने ‘अहिल्या रत्न पुरस्कार सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता, लायन्स क्लब, आय.टी.आय. सिग्नल, सातपूर रोड, नाशिक येथे होणार आहे.

या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक, जनसेवक, प्रतिष्ठित उद्योगपती, सेवाभावी संस्था, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा ‘अहिल्या रत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शिल्पा झरेकर, अध्यक्षा सौ. अरुणा दरगुडे व सचिव रंगनाथ दरगुडे यांनी केले आहे.

कार्यक्रमात फेटा बांधून सन्मान, शॉल, ट्रॉफी व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार असून, त्यानंतर भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button