आंदोलनपिंपरी-चिंचवडभेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर पुढील दिशा ठरवण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहरची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १९ ऑक्टोबर २०२६ काल रविवारी सायंकाळी आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात पुढील दिशा व भूमिका निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील नेते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या काळात हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्रातील विचारवंत, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून कायदेशीर बाबींच्या अभ्यासासोबतच प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आला.

कलावंतांची सामाजिक परिवर्तनातील भूमिका लक्षात घेता, त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करणे, आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील विविध कायदेशीर बाबी जनतेपर्यंत पोहोचवणे आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे, या विषयांवर पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे.

सामाजिक एकजूट, वैचारिक प्रबोधन आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर पुढील वाटचाल करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button