साईराम पिक्चर्स निर्मित लघूपट “सक्षम-लाडकी बहीण” लवकरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल..

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड दि. २७ ऑक्टोबर २०२६ ‘सक्षम – लाडकी बहीण’ या मराठी लघुपटाची निर्मिती साईराम पिक्चर्सने केली आहे. तसेच याचे दिग्दर्शन कु. श्रुती भारती, क्रिएटिव्ह दिग्दर्शन, कथा व गीतलेखन सचिन पिंपरीकर यांनी केले आहे. संगीत साईराम मुझिकचे आहे. तर छायाचित्रण (DOP) भास्कर ठोकळ यांनी केले आहे. तसेच प्रॉडक्शन मॅनेजरची जबाबदारी अजय साखरे यांनी पारपाडली.
चित्रपटाची संपूर्ण माहिती
चित्रपटाचे नाव: “सक्षम – लाडकी बहीण”
ब्रीदवाक्य: लाडकी बहीण… सशक्त स्त्री, सक्षम कुटुंब
विषय सामाजिक, कौटुंबिक, भावनिक मराठी लघुपट असल्याचे निर्माते सचिन पिंपरीकर यांनी आमच्याशी बोलताना सांगीतले.
लघूपटाची थोडक्यात कथा
मुक्ता ही एक गृहिणी आहे. घर, संसार आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना ती स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आर्थिक अडचणी, कौटुंबिक ताणतणाव आणि जीवनातील संघर्ष यांतून तिचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा प्रवास उलगडतो. पती महादेव आणि मुलगी सई यांच्यासोबतच्या कौटुंबिक नात्यांतून स्त्रीचे योगदान, तिच्या भावभावना आणि तिला मिळणाऱ्या संधींचे महत्त्व या लघूपटात मांडले आहे.
यावेळी पिंपरीकर म्हणाले की या मराठी लघुपटात प्रमुख भमिका गौरी रत्नपारखी- (मुक्ता), सचिन पिंपरीकर- (महादेव), वैदही म्हस्के- (सई) (बालकलाकार), प्रिया खंडागळे- (अंगणवाडी ताई), प्रियंका मोरे- (जोशी ताई), बापू बल्लाळ- (प्राध्यापक), प्रदीप स्वामी- (मार्गदर्शक शिक्षक), श्रीकांत उमरीकर- (दुकानदार), उज्ज्वला म्हस्के- (जोशी ताईंची मैत्रीण) अशा अविस्मर्निय भूमिका बजावल्या आहेत.
हा लघूपट अंदाजे २० मिनिटांचा असून या लघूपटाचा मुख्य सामाजिक संदेश खालील प्रमाणे आहे.
स्त्री ही केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नसून स्वतःची ओळख निर्माण करण्याची क्षमता असलेली व्यक्ती आहे. तिला योग्य संधी, सन्मान आणि कुटुंबाची साथ मिळाली, तर ती स्वतःबरोबर संपूर्ण कुटुंबालाही सक्षम बनवू शकते.
“लाडकी बहीण… सशक्त स्त्री, सक्षम कुटुंब”
हा केवळ लघूपटाचा संदेश नसून समाजात स्त्रीविषयी आदर, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाची जाणीव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हा लघूपट बनवण्या मागील आमचा उद्देश असा आहे की मनोरंजनासोबत समाजाला सकारात्मक संदेश देणे, महिलांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे आणि कुटुंबात स्त्रीच्या क्षमतेला सन्मान मिळवून देणे, हाच खरा लघूपटाचा उद्देश आहे असे यावेळी पिंपरीकरांनी सांगीतले.
या लघूपटाची निर्मिती साईराम पिक्चर्सच्या माध्यमातून करण्यात आली असून, लघूपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.



