
प्रतिनिधी पुणे दि. २९ ऑक्टोबर २२०६ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पुणे शहराध्यक्षपदी बद्रुद्दीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा. सचिन पडवळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष मा. संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते जाकिर पठाण, शाब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सरचिटणीस मा. सूर्यकांत तांडेल यांनी बद्रुद्दीन शेख यांच्या नियुक्तीची माहिती दिली.
पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष बद्रुद्दीन शेख यांनी व्यक्त केला. वाहतूक क्षेत्रातील विविध प्रश्न, वाहतूकदारांच्या अडचणी आणि संघटनात्मक कामांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मा. संजय मोरे यांनी बद्रुद्दीन शेख यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे पुणे शहरातील महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



