पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अभियंता या पदावर विराजमान असलेले प्रमोद ओंबासे व अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांना निलंबित करा- देवेंद्र तायडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० ऑक्टोबर २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मा. विजय सूर्यवंशी,
आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यांना निवेदन देण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे लिहीतात की पिंपरी चिंचवड
महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी प्रमोद ओंबासे यांना दिनांक २८ ऑक्टोबर २० २६ रोजी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांचे ही लालचलुचपत विभागाच्या चौकशी मध्ये नाव असल्याचे कळते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उच्च पदावर असलेले व्यक्ती महानगरपालिकेच्या कंत्राटदारांच्याकडून खंडणी मागत असेल तर कोणताही ठेकेदार कसलेही काम योग्य पद्धतीने करू शकत नाही. म्हणून आपणास विनंती आहे की महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ ठेवण्यासाठी आपण महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी प्रमोद ओंबासे व अजय सूर्यवंशी यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात यावे. व त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सेवेत आल्यापासून आत्तापर्यंतचे सर्व मालमत्तेची, बँक खात्याची चौकशी करावी. तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची व बँक खात्यांची चौकशी करून प्रमोद ओंबासे व अजय सूर्यवंशी यांनी चुकीच्या पद्धतीने माया जमवली असल्यास त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे. आपण यामध्ये न्यायप्रविष्ट पद्धतीने लक्ष घालून कार्यवाही कराल अशी आशा बाळगतो अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यपद्धती वरती सर्वसामान्य जनतेला अविश्वास निर्माण होईल. याबाबत आपण लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा तामडे यांचे वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत शिंदे जयंती, काशीनाथ जगताप, राजु खंडागळे, संतोष शिंदे, अजय पिल्ले, अनिल भोसले, नितीन बुगासे उपस्थित होते.




