अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
महामानवांच्या जयंतीत सलोखा सोशल फाउंडेशन व शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशनच्या वतिने शरबत वाटप..

प्रतिनिधी भोसरी दि. १६ एप्रिल २०२४ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल २०२४ रोजी नुर मोहल्ला भोसरी येथे शरबत वाटप करण्यात आले. मिरवणुकीमध्ये आलेल्या सर्व भिमसेनीकांना शरबत वाटून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सलोखा सोशल फाउंडेशन व शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हरीश डोळस व मोहसीन शाह यांनी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शाह जमातचे अध्यक्ष अतहर शाह, राहुल ओव्हाळ, पंचशील मंडळाचे अध्यक्ष गंगावणे सर आरीफ खान, शुभम डोळस, साजिद शेख, हे उपस्थित होते.





