नीलम गोऱ्हेंना निलंबित करण्याची महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी..

प्रतिनिधी मूंबई काल विरोधी पक्ष शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज मा. राज्यपाल रमेशजी बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.
या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेस नेते डाॅ. नितीन राऊत, ॲड. अनिल परब, शिवसेना नेते सुनील प्रभू, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरूण लाड आणि आ. रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.




Melany Cantrell