आमदार रोहितदादा पवार यांची पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळाना भेटी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ सप्टेंबर २०२३ आमदार रोहितदादा पवार यांची पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळाना भेटी आणि गणरायाची आरती कार्यक्रम
राष्ट्रवादीने तुषार कामठे या तरुण चेहऱ्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि शहराच्या राजकारणात एक नवी चुरस आणि चैतन्य निर्माण झाले. आता शहर नक्की कुणाचे याची चक्रे जोरात फिरू लागली.नुकतेच आमदार रोहित पवार यांनी बाईक रॅली आणि पत्रकार परिषद घेउन पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालणार असल्याचे विरोधकांना सूचक इशारा दिला.
त्यातच आज ( ता. 23 ) शनिवार हा दिवस रोहित पवार यांनी खास पिंपरी चिंचवडच्या गणेश मंडळाना भेटी देण्यासाठी काढला आहे. आज दुपारपासून ते पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील गणेश मंडळाना भेट देतील. यावेळी ते गणेश मंडळासोबतच काही आजी माजी नगरसेवक आणि जेष्ठ नेत्यांच्या आणि गृहनिर्माण संस्थाच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत.
गणरायाला लोकांच्या समस्या सांगून त्या सोडवण्याची आम्हाला शक्ती-युक्ती आणि आशीर्वाद दे, हे हितगुज करण्यासाठी आमदार रोहितदादा पवार येणार असल्याचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.शहराच्या राजकरणात रोहित पवार यांच्या एंट्रीने येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड कडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागणार यात काही शंका नाही.