आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठी सूरू असलेल्या आंदोलनास भीमशाही युवा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २१ जानेवारी २०२५ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी येथे माता रमाई स्मारक झालेच पाहिजे या करिता वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे सचिव राजेंद्र साळवे हे गेल्या सहा दिवसापासून भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी धरणे आंदोलनास बसलेले आहेत
त्या आंदोलनाला भिमशाही युवा संघटनेच्या वतीने भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी भीमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे बोलले की माता रमाईचे स्मारक हे भीमसृष्टी शेजारील जागेतच व्हावे कारण जवळपास तेरा चौदा वर्ष माता रमाई स्मारकाचा आंदोलन रूपी लढा देत आहोत तेव्हां प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेवून स्मारक लवकरात लवकर करावे. यावेळी भीमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नितीन कसबे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल सुरवसे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रवीण धाईजे
युवा नेते कमलेश दादा वाळके हे उपस्थित होते. तसेच यांनी यावेळी पाठींब्याच्या पत्रावर सह्या देखील केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!