महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

ओ. बी. सी. समाज जागा करण्या करीता समाज परिषदेचे आयोजन..

प्रतिनिधी पूणे २२ सप्टेंबर २०२३ शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्य पद्धतीचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४, सत्यशोधक समाज स्थापना २४ सप्टेंबर १८७३,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार २४ सप्टेंबर १९३२ निमित्त.
सत्यशोधक ओबीसी आरक्षण बचाव परिषद-पुणे
रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१:०० वा. ओ. बी. सी. समाज जागा करण्या करीता समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ संत सावता माळी भवन, शनिवार वाड्याच्या पूर्वेस लाल महल जवळ बुधवार पेठ पुणे,२.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रावण देवरे, प्रमुख पाहुणे मा.आमदार कपिल पाटील (संयोजक जनता दल युनायटेड), मा. बाळासाहेब शिवरकर (माजी मंत्री), मा. कमलताई ढोले पाटील (माजी आमदार), मा. दीप्तीताई चवधरी (माजी आमदार), मा. बाबासाहेब बंडगर (मा. कुलगूरू अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर), मा. विश्वनाथ तोडकर (भूमिहीन चळवळीचे नेते), मा. विठ्ठलराव सातव (अध्यक्ष पुणे जनता दल सेक्युलर), कार्यक्रमाचे उदघाटक डाॅ. बेनझीर तांबोळी (सत्यशोधक फातिमा शेख महिला मंच), मा. रोहिणी ताई भोसले (सत्यशोधक), मा. स्मिताताई लडकत (संचालिका कॅंटोन्मेंट बँक पुणे), मा. शितलताई सचिन माळी/साठे (सत्यशोधक शाहीर)
सत्यशोधक बहिण-भावांनो! सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. सिंधु संस्कृतीच्या महान वारसदारांनी बळी राजाच्या सुपुत्रांनी भारताला सुजलाम सुफलाम केले होते. त्याच काळात परकीय आर्यभटांनी भारतावर आक्रमण केले वसुसंपन्न असलेल्या आपल्या सिंधू संस्कृतीला उध्वस्त केले. मूळ भारतीय जनतेवर वर्ण-जातीव्यवस्था लादून त्यांना देशोधडीला लावले. शूद्रादिअतिशूद्र अशी हिन ओळख दिली. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी शिक्षणाचे दारे खुली करून बहुजनांना जागृत केले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून शूद्रादिअतिशुद्रांना स्वाभिमानी ओळख प्राप्त करून दिली. सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना करून वैदिक- सनातन धर्माच्या ब्राह्मणी शोषणातून मुक्तीचा मार्ग दाखविला. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘अखंड’ असे क्रांतिकारक साहित्य निर्मिती केली. उक्ती-कृती-लेखनीतून जातीअंताचे तत्वज्ञान मांडले. तात्यासाहेब महात्मा जोतीराव व सावित्रीमाईंचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्ताने आपण पुण्यात समाजाचे अधिवेशन घेत आहोत. या अधिवेशनास आपण सर्व सत्यशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती. सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे.

प्रतिनिधी पूणे २२ सप्टेंबर २०२३ शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्य पद्धतीचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४, सत्यशोधक समाज स्थापना २४ सप्टेंबर १८७३,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार २४ सप्टेंबर १९३२ निमित्त.
सत्यशोधक ओबीसी आरक्षण बचाव परिषद-पुणे
रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१:०० वा. ओ. बी. सी. समाज जागा करण्या करीता समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ संत सावता माळी भवन, शनिवार वाड्याच्या पूर्वेस लाल महल जवळ बुधवार पेठ पुणे,२.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रावण देवरे, प्रमुख पाहुणे मा.आमदार कपिल पाटील (संयोजक जनता दल युनायटेड), मा. बाळासाहेब शिवरकर (माजी मंत्री), मा. कमलताई ढोले पाटील (माजी आमदार), मा. दीप्तीताई चवधरी (माजी आमदार), मा. बाबासाहेब बंडगर (मा. कुलगूरू अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर), मा. विश्वनाथ तोडकर (भूमिहीन चळवळीचे नेते), मा. विठ्ठलराव सातव (अध्यक्ष : पुणे जनता दल सेक्युलर), कार्यक्रमाच्या उदघाटक : डॉ. बेनझीर तांबोळी (सत्यशोधक फातिमा शेख महिला मंच), मा. रोहिणी ताई भोसले (सत्यशोधक), मा. स्मिताताई लडकत (संचालिका कॅंटोन्मेंट बँक पुणे), मा. शितलताई सचिन माळी – साठे (सत्यशोधक शाहीर)
सत्यशोधक बहिण-भावांनो! सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. सिंधु संस्कृतीच्या महान वारसदारांनी बळीराजाच्या सुपुत्रांनी भारताला सुजलाम सुफलाम केले होते. त्याच काळात परकीय आर्यभटांनी भारतावर आक्रमण केले वसुसंपन्न असलेल्या आपल्या सिंधू संस्कृतीला उध्वस्त केले. मूळ भारतीय जनतेवर वर्ण-जातीव्यवस्था लादून त्यांना देशोधडीला लावले. शूद्रादिअतिशूद्र अशी हिन ओळख दिली. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी शिक्षणाचे दारे खुली करून बहुजनांना जागृत केले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून शूद्रादिअतिशुद्रांना स्वाभिमानी ओळख प्राप्त करून दिली. सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना करून वैदिक- सनातन धर्माच्या ब्राह्मणी शोषणातून मुक्तीचा मार्ग दाखविला. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘अखंड’ असे क्रांतिकारक साहित्य निर्मिती केली. उक्ती-कृती-लेखनीतून जातीअंताचे तत्वज्ञान मांडले. तात्यासाहेब महात्मा जोतीराव व सावित्रीमाईंचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्ताने आपण पुण्यात समाजाचे अधिवेशन घेत आहोत. या अधिवेशनास आपण सर्व सत्यशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती. सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मानाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. : १) महात्मा फुले सत्यशोधक, २) महात्मा फुले सत्यशोधक साहित्यिक, ३) महात्मा फुले आदर्श शिक्षक, ४) सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, ५) महात्मा फुले आदर्श समाजसेवक, ६) सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका, ७) महात्मा फुले उद्योगपती, ८) महात्मा फुले कृषी भूषण, ९) सावित्रीबाई फुले कुटीर उद्योग, १०) महात्मा फुले संशोधक, ११) सत्यशोधक विधी प्रमुख, १२) सत्यशोधक प्रबोधनकार, १३) सत्यशोधक प्रशिक्षक, सत्यशोधक प्रशिक्षिका, १४) महात्मा फुले व्यायाम प्रशिक्षक, १५) सत्यशोधक शाहीर, १६) ८०% च्या वर मार्क मिळवणारे २०२३ चे दहावी बारावीतील ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार वह्या वाटप करण्यात येणार आहेत तरी योग्य उमेदवाराने आपला बायोडाटा मार्कलिस्ट 94220 68771 या मोबाईल नंबर वर पाठवावा ही नम्र विनंती.
ठराव व प्रमुख मागण्या
1) ठराव जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. 2) जात निहाय जनगणनेस जो पक्ष विरोध करेल त्या पक्षास ओबीसीने मतदान करू नये.
3) कोणत्याही प्रगत जातीला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये. 4) ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण देऊन संख्येच्या प्रमाणात आर्थिक बजेट द्यावे. 5) ओबीसीला केंद्रात मंत्रालय हवे. 6) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा चा लोगो शनिवार वाडा विषमतेचे प्रतीक आहे त्या ठिकाणी फुले वाडा वापरावा. 7) महात्मा फुले स्थापित पहिली मुलींची शाळा भिडे वाडा येथे सावित्रीबाई फुले आंतरराष्ट्रीय स्मारक करावे. 8) सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव ला सावित्री सृष्टी निर्माण करावी. 9) शेतीसाठी स्वामीनाथन आयोग पूर्ण लागू करावा. 10) अग्नीवीर भरती रद्द करून पूर्वी प्रमाणे सैन्य-भरती करावी. 11) जुनी पेन्शन योजना लागू करावी 12) प्रत्येक जिल्ह्यात २ वसतिगृहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी बांधावीत. SC, ST प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. 13) महाज्योती ला बार्टी प्रमाणे निधी आणि सवलती देण्यात यावी.
मी पाहिलेले हरी नरके : या ग्रंथासाठी ज्यांनी हरी नरके यांच्या सहवासामध्ये काही ठळक अनुभव घेतलेले आहेत. ज्याचा समाजाला आजही उपयोग होईल असे लेख नाव पत्ता व्हाट्सअप नंबर सहीत पाठवावेत.
तरी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी समाज सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!