कोलशेत येथे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. २४ फेब्रुवारी २०२५ महाशिवरात्री निमित्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मंडळी कोलशेत यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ गुरूवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२५ सूरू असणार आहे. सप्ताहाचा प्रथम प्रारंभ १९८० साली गुरूवर्य ह .भ .प सावळाराम महाराज (आगरी वाघ) म्हणून त्यांची गणना केली जाते. त्याचप्रमाणे ह .भ. प वै. सदाशिव बाबा पाटील व कोलशेत गावातील पहिले सरपंच कै. श्री. गजानन अर्जुन घरत यांच्या श्रमातुन आजतागायत चालू आहे. व वारकरी संप्रदायाचा प्रसार होत आहे. आगरी समाजात चालत असलेल्या अंधश्रद्धा, व चुकीच्या चालिरीती यावर चिंतन करून समाजात भक्तीचे महत्त्व वाढावे, त्याचप्रमाणे आषाढी वारी, कार्तिकी वारी यांच्या मोठमोठ्या दिंड्या काढून श्रीक्षेत्र पंढरपूर नगरी, व श्रीक्षेत्र आळंदी नगरी वारी करून त्या ठिकाणी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना निवारा व राहण्याची सोय व्हावी यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी येथे आगरी धर्मशाळा बांधल्या आहेत. त्याचप्रमाणे आगरी समाजातील नवयुवकांसाठी किर्तन व प्रवचन करण्यास शिकवण्यासाठी या वास्तूंचा फार मोठा उपयोग झाला आहे. त्यातुन आगरी किर्तनकार तयार होऊन आज समाज प्रबोधन करत आहेत. असा हा वारसा आजतागायत जपून ठेवणे आपले आद्य कर्तव्य आहे असे कोलशेतच्या ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्त्यांनी यावेळी सांगीतले.



