आंदोलनमहाराष्ट्रमूंबईसामाजिक

भिवंडीत ग्राम सेवक यांची गटविकास अधिकारी यांना तक्रार..

प्रतीनीधी सतिश पाटील मुंबई दि. २९ ऑक्टोबर २०२५ काल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गट विकास अधिकारी यांचा अनोख्या रूपात सत्कार करण्यात आला.
दिनांक २४/०९/२५ रोजी प्रहारने दिलेल्या आंदोलनाच्या ईशाऱ्यावरून गट विकास अधिकारी यांच्या दालनात सुनावणीचे आयोजन केले होते. ज्यामधे प्रहारने केलेल्या मागणीवर चर्चा होऊन प्रोसेसिंग नुसार ग्रामसेवकाना गटविकास अधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या होत्या व प्रहारच्या मागण्या पुर्ण कारण्यासाठी ८ दिवसांची मुदत दिली होती. त्यातील दिव्यांग बांधवांच्या निधीचे झालेल्या गैरवापराचे पैसे ग्रामपंचायत अंजूर मार्फत पुन्हा त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु प्रहारची दुसरी महत्वाची मागणी म्हणजे मागिल ३ वर्षात ग्रामपंचायत दिवे अंजूर व अंजूर ग्रामपंचायत यांनी केलेल्या विकास कामाची यादी व ऑडिट रिपोटची माहिती मिळण्यासाठी माहिती अधिकारी भरून तसेच गट विकास अधिकाऱ्यांच्या दालानात सुनावणी होऊन गट विकास अधिकारी मा. खामकर साहेबांनी ग्रामसेवकांना लिखीत सूचना देऊन तसेच महिना भरापासून प्रहार मार्फत पाठपुरावा करून देखील माहिती ग्रामसेवक देण्यास टाळा टाळ करत असल्यामुळे गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला कोणतेच महत्व ग्रामसेवक दिवे अंजूर विजय जाधव हे देत नाहीत. जर ग्रामसेवक गट विकास अधिकाऱ्याचेच ऐकणार नसतील तर अश्या गट विकास अधिकाऱ्याची गरज तरी काय आहे? या अनुषंगाने त्यांच्या स्वागताच्या वेळीस जरी प्रहार शुभेच्छा देण्यास गेले नसले तरी त्यांच्या निरोप समारंभच्या उद्देश्याने आज प्रहार जनशक्ती पक्ष व गावदेवी शेतकरी संघटना दिवे अंजूर त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे खोचक आभार मानून जर त्यांचे कोणी आदेश पाळणार नसेल व संबंधित ग्रामसेवकावर कारवाई होणार नसेल तर आजच त्यांनी निरोप घ्यावा आसा प्रहारने गट विकास अधिकाऱ्यांना ठणकावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!