देश-विदेशशहरसामाजिक

अदानी उद्योग समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोणाचे ?

प्रतिनिधी- श्री. राहुल गांधी यानी ७ फेब्रुवारीला संसदेत अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारले. अदानी उद्योग समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोणाचे ? यामध्ये एक चिनी नागरिकाचाही सहभाग आहे. हा चिनी नागरिक कोण ?
उद्योगपती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा संबंध काय?
विमानतळ, संरक्षण क्षेत्र उर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अदानीला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाव आणला, याचे श्री. राहुल गांधी यांनी कागदपत्रासह पुरावे दिले.
श्री. राहुल गांधी व श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत अदानी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला परंतु या
दोघांच्या भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला.
अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती गठित (JPC) करून चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. परंतु मोदी सरकार संसदेचे कामकाजच चालू देत नाही,
सत्ताधारी पक्षच संसदेचे कामकाज चालू देत नाही. काँग्रेस पक्ष जेपीसीची मागणी करताच संसदचे
कामकाज स्थगित केले जाते.
अदानीला वाचवण्यासाठी मोदी सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे. मोदी सरकारमधील मंत्र्यानी राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले, त्यावर राहुल गांधी यांनी संसदेत उत्तर देण्याची तयारी दाखवली पण त्यांना बोलण्याची परवानगीच दिली जात नाही.
श्री. राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्या नंतर ९ दिवसानंतर राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि २४ तासातच त्यांची खासदारकी रद्द केली व आता सरकारी घर खाली करण्याची नोटीस पाठवली.
मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करत आहे. अदानी घोटाळ्याची चर्चाच होऊ नये म्हणून भाजपा जाणीपूर्वक राहुल गांधींवर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. परदेशात राहुल गांधी यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे पण त्यात काहीही तथ्य नाही.
राहुल गांधी यानी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपाकडून धादांत खोटा आरोप केला आहे.
नीरव मोदी, ललीत मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत.
भाजपा ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचान्याशी जोडून ओबीसी समाजाचाच करत आहे.
काँग्रेस पक्षात ओबीसी समाजाचा योग्य सन्मान राखला जातो, सध्या काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपाकडून धादांत खोटा आरोप केला जात
आहे. राहुल गांधी देश जोडण्याचा संकल्प घेऊन चार हजार किलोमीटरची पदयात्रा करतात ते एका जात समुदायाचा अपमान कशाला करतील?
मोदी सरकार चोर, दरोडेखोर, घोटाळेबाजांचा पर्दाफाश करणाऱ्या राहुल गांधी यांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करत आहे. पण काँग्रेस पक्ष अत्याचारी, जुलमी ब्रिज सत्तेला घाबरली नाही, मोदी सरकारला कशासाठी घाबरेल? लोकशाही, संविधान व देश वाचवण्याची ही लढाई आहे. काँग्रेस ही लढाई जनतेच्या दरबारातही लढेल व विजयी होईल. असे काॅंग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे व पिंपरी चिंचवड काॅंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी सांगीतले. यावेळी पिंपरी चिंचवड काॅंग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!