आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

बुलेट ट्रेन मूळे होणार म्हणे विकास? भरोडी गावच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणणारी योजनाच आहे भकास?..

शासनाच्या मनमानी कारभारा विरोधात ग्रामस्थांचे अंदोलन..

प्रतीनीधी सतिश पाटील मुंबई दि. १९ नोव्हेंबर २०२५
भरोडी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या बुलेट ट्रेन कामबंद आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणास काल आमच्या प्रतिनिधीने भेट दिली.
भरोडी गाव विद्यामंदिर अंजूर या मार्गाचा अभाव शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी अडचण बनला आहे. मुलांना सुरक्षितपणे शिक्षणासाठी ये-जा करता यावी, ही अत्यावश्यक मागणी तातडीने सोडवली जाणे आवश्यक आहे. तसेच भरोडी गावातील शेतकऱ्यांना अंजूर आणि आलिमघर गावालगत असणाऱ्या त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांचा दैनंदिन शेती व्यवसायात देखील अडथळा येत आहे. या दोन्ही मागण्या ग्रामस्थांच्या हक्काच्या व न्यायाच्या आहेत. ग्रामस्थांच्या लढ्यात मी सदैव त्यांच्या सोबत उभा आहे. असे प्रतिनिधी सतिश पाटील यांनी सांगीतले. यावेळी ते बोलले की ‘विकास नक्कीच झाला पाहीजे पण विकासाच्या आड शाळांवर, शेतकऱ्यांवर आणि स्थानिक ग्रामस्थांवर जर अन्याय होत असेल तर तो विकास नक्कीच भकासस असेल. अशा भकासाला ग्रामस्थ गावात होवू देणार नाहीत. याचा भिवंडीतील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांकडून विरोध दर्शविला आहे अणि बुलेट ट्रेन प्रकल्प विरोधात अंदोलनास बसले आहेत. जोपर्यंत प्रशासन योग्य पर्यायी रहदारीचा रस्ता देत नाहीत किंवा या संदर्भात लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!