महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २३जून २०२५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फारसी भाषा ही त्यावेळी वापरात असताना सुद्धा, शहाजीराजांनी राजमुद्रा बनवली ती संस्कृतमध्ये… राज्य व्यवहारात आणि चलनात त्यावेळेस फारसी भाषाच असताना, सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश, राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला… महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह केला…सन १६३० मध्येजी मराठी भाषा फक्त १४ टक्के वापरली जात होती… ती मराठी भाषा १६७० मध्ये जवळपास ६६% स्वराज्याच्या व्यवहारात चलनात वापरण्यात आली… सन१७२८ मध्ये ती ९४ टक्के वापरण्यात आली होती… हे झालं कशामुळे, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा आग्रह धरल्यामुळे… छत्रपती शिवाजी महाराज यांना चांगलेच ठाऊक होते की, जेव्हां परकीय आपल्या वरती आक्रमण करतात… तेव्हां ते फक्त तुमच्या भूमीवर नाही,.. तर ते तुमच्या भाषेवरती करतात… आणि एकदा का तुमची भाषा तुमच्यापासून सुटली की, तुमची संस्कृतीशी असलेली नाळ तुटते आणि एकदा संस्कृतीची नाळ तुटली की, राष्ट्राचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे खास करून राज्य सरकारने कारण हे सरकार राज्यावर आले ते शिवरायांचे नाव घेवून म्हणून या सरकारने शिवरायांकडून याचा बोध नक्कीच घ्यावा! व महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच भाषा असावी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!