गून्हापोलिसमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

महिलांची वस्त्रे परिधान करत चोरी करणार्‍या चोराच्या मूंबई पोलिसांनी अखेर मूसक्या आवळल्या..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २६ जूलै २०२५
मुंबईतील मलाडमध्ये शक्कल लढवून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. चोर हा दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायला मलाड व आसपासच्या भागात यायचा.
मुंबईतील मलाडमध्ये शक्कल लढवून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली त्यानंतर अशी माहिती समजली की चोर हा दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायला यायचा. या अतिहुशार चोराने मुंबईतील मलाड, कांदिवली, बोरिवली भागामध्ये अनेक चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोरी करताना चोर दररोज वेगवेगळी शक्कल लढवायचा. हा चोर रेल्वे स्थानकातील आसपासच्या भागामध्ये चोरी करायला यायचा. सीसीटीव्हीत आपली ओळख पटू नये म्हणून तो चोरी करताना रेल्वे ट्रॅकवर जाऊन महिलांचे कपडे परिधान करायचा मगच चोरी करायचा. चोरीनंतर तो पुन्हा रेल्वे ट्रॅकवर यायचा आणि परिधान केलेले महिलांचे कपडे काढायचा. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन तिथून पळ काढायचा.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी चोराचे नाव रणजीत कुमार उर्फ मुन्ना असे आहे. बिहारमधील खगरिया जिल्ह्यातल रहिवासी आहे. आरोपींकडून ३६ तोळे हिरे जडीत सोन्याचे दागिने, ०१ किलो चांदी आणि १३ लाख बँक ठेवी रक्कम, सोने वितळवण्याचे यंत्र, छन्नी हातोडा सर्वकाही जप्त करण्यात आलं आहे.
चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत ही तब्बल ४१ लाख रुपये इतकी आहे. शिवाय त्याने बिहारमधे जमीन खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये आणि मालवणीत घर खरेदी करण्यासाठी ०६ लाख रुपये दिले होते. मालाड पोलिसांनी सोने चांदी सह सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात मालाड पोलीस साधारण मार्चपासून चोराचा शोध घेत होते. महिन्याभरापूर्वी मालाड पोलीस ट्रॅकवरील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत असताना १०० ते १५० सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर आरोपी महिलाचे कपडे परिधान केलेला दिसला होता.
दरम्यानच्या काळात मुंबईमध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ निर्माण होऊ लागली होती. मालाडमधील इतर काही ठिकाणी या चोरीच्या घटना घडल्या आहेत. तपासादरम्यान, आरोपी हा मालवणी येथे जाताना दिसला. मालाड पोलिसांनी मालवणीत सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या अटकेमुळे एकूण ०८ गुन्ह्यांचा गौप्यस्फोट झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!