
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड मणिपूर मधील महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरातील. भिमशाही युवा संघटना. बहुजन एकता आंदोलन, पॅंथर युवा मोर्चा, व पिंपरी चिंचवड शहरातील अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.व उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. देश भरामध्ये अनेक संघटनांनी मणिपूर मधील घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवत असतानाच पिंपरी चिंचवड शहरात देखील दिनांक 24 /07 /2023 रोजी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी या ठिकाणी दुपारी बारा वाजता. निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संघटनेच्या पक्षाच्या मंडळाच्या प्रतिष्ठानच्या महिला मंडळांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना आम्ही जाहीर आवाहन करत आहोत की उद्याच्या आंदोलनामध्ये सर्वांनी कोणताही पक्षपात न करता आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, बहुजन एकता आंदोलन राजेंद्र पवार, बहुजन सम्राट सेना अध्यक्ष संतोष निसर्गध
पॅंथर युवा मोर्चा. रामभाऊ ठोके, शिवसेना युवा नेते गोपाळ मोरे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती शांताराम खुडे, या व शहरातील अनेक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. असे शिवशंकर उबाळे यांनी सांगीतले



