छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडी सभासदांच्या कामगार मेळाव्यात यशवंत भोसलेंचे मार्गदर्शन..

प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर दि. ०९ जून २०२५ कंत्राटी पद्धतीवर प्रचंड शोषण सुरु असल्याने या पुढील काळ हा श्रमिकांच्या व पुढील युवा पिढीसाठी खुपच हालाकीचा राहणार आहे, श्रमिक युवा पिढीसाठी हे मोठे आव्हान राहणार आहे, एकत्र येऊन संघटित होऊन श्रमिकाने, युवकांने त्यास प्रतिकार केला नाहीं, तर मूठभर भांडवलदार आणि bureaucrats सरकारी अधिकारी वर्ग हा देशातील जनतेला ठेकेदारांच्या दावनीला बांधून गुलाम करतील. गेली ३० वर्षे आम्ही संघर्ष करूनही आमचे सरकार आणि आम्ही दोघेही हतबल आहोत.
जागतिकिकरणात पूर्वेकडील देशांनी मानवतेचा धर्म जपला व देशातील नोकरदार वर्गाची आरोग्याची त्याच्या राहणीमानाची, त्याच्या परिवाराची काळजी घेऊन त्यांच्या मानवी हक्काला तडा न देता जागतिक व्यवसाय स्पर्धेत अग्रनी सहभाग ठेवला, आमच्याकडे मात्र हेच उलट झाले या स्पर्धेत पुढे येण्यासाठी भारतीय नागरिकांना यंत्राच्या जागी ठेवण्यात आले तेही कंत्राटी मध्ये असे चित्र आता तरी दिसत आहे, त्या मुळे त्यांच्यातील माणूस संपला आहे, हे चित्र बदलावे लागणार असल्यानें संघटित व्हा आपले अधिकार मागून घ्या, संविधान हा आपला ग्रंथ आहे त्याचे जतन आपले केंद्रातील व राज्यातील सरकार करत आहे त्या बरोबर आपणासही ते जतन करावे लागणार आहे, त्यासाठी एक व्हा संघर्ष करा असे आवाहन भोसले यांनी या सभेत केले.
श्री दत्तात्रय भालेराव सर यांनीही संघटित श्रमिक ही देशाची ताकद असून राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
अनेक कामगार संघटनेच्या प्रतिनिधिनी आपली तळमळ व व्यथा या वेळी मांडल्या.



