अभिवादनदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेष
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली दि. २७ डिसेंबर २०२४ भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग (manmohan singh) यांचे गुरुवारी, २६ डिसेंबर २०२४ रोजी, वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाला दुजोरा दिला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा पंतप्रधानपद भूषवले आणि २००४ ते २०१४ या दशकात भारताच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर आपली ओळख प्रस्थापित केली.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील नेत्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. डॉ. सिंग यांची विद्वत्ता, साधेपणा आणि शांत नेतृत्व भारतासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले.