आरोग्यगून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

आज ही “नकोशी” फेकली जातेय कचरर्‍याच्या कूंडीत..

प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कचरा कुंडीत आज सकाळी एक नवजात अर्भक सापडलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसाचे असलेले हे “स्त्री अर्भक” आहे. मात्र हे अर्भक कुणी टाकलं, याबाबत सी.सी.टीव्ही. द्वारे संबंधिताचा शोध घेणे सूरू आहे.
नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिस देखील आले होते. पोलिसांनी अर्भकाच्या माता-पित्याचा शोध घेणे सूरू केले आहे.

पण हे नवजात अर्भक वायसीएम रुग्णालयातील नाही, त्या स्त्री अर्भकाला रुग्णालयाच्या पाठीमागील गेटमधून येवून कचरा कुंडीत फेकलं आहे. त्यामुळे सदरील नवजात अर्भक कुणी टाकलं, त्याचा शोध आम्ही घेत असून सी.सी.टीव्ही. तपासले जात आहे, असे वायसीएम रुग्णालयाचे डीन डाॅ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!